दिग्गज क्रिकेटपटू असलेल्या विमानाच्या इंजिनात झाला बिघाड; त्यानंतर...

कानपूर विमानतळावरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Road Safety World Series
Road Safety World SeriesSaam TV

कानपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शुक्रवारी १६ सप्टेंबरला कानपूर विमानतळावर मोठा अनर्थ टळला. इंदौरला जाणाऱ्या एका इंडिगो विमानात (Indigo Flight) तांत्रिक बिघाड झाल्यामुळं इंजिन खराब झाला. त्यामुळे इंदौरसाठी या विमानाने टेक ऑफ केलं नाही. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये (2022 Road Safety World Series) सहभागी होणारे खेळाडू या विमानाने प्रवास करणार होते. इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना आणि खेळाडूंना दुसऱ्या विमानाने इंदौरला रवाना करण्यात आले. त्यामुळे सुदैवाने मोठा अपघात टळला आहे. (International cricketers latest News Update)

Road Safety World Series
Sanju Samson : संजू सॅमसन भारताचा कर्णधार, BCCI ने घेतला मोठा निर्णय

SA-इंग्लंडच्या खेळाडूंना जायचं होतं इंदौरला

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज २०२२ मध्ये आतापर्यंत सात सामने झाले आहेत. पुढील होणारे पाच सामने इंदौरला होणार आहेत. त्यामुळे खेळाडू इंदौरला जाणार होते. काही खेळाडूंना काल गुरुवारी इंदौरला पाठवण्यात आलं. तर उर्वरीत खेळाडू आज प्रवास करणार होते. गुरुवारी सहा देशांचे १०० हून अधिक खेळाडू इंदौरला पोहचले होते. यामध्ये सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, ब्रायन लारा, शेन वॉटसन, ब्रेट ली या खेळाडूंचा समावेश होता. इंग्लंड, दक्षिण आफ्रीकेच्या काही खेळाडूंना आज प्रवास करायचा होता.

Road Safety World Series
Akola : 'पत्नीच्या आजाराला पैसे देतो' म्हणणं व्यक्तीला पडलं महागात; मजुराने केलं भयकंर कृत्य

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा हा दूसरा सीजन खेळवला जात आहे. गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर सलग दोन विजयानंतर श्रीलंकाचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर इंडिया लीजेंड्स, तिसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिज लीजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्स चौथ्या स्थानावर आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com