IPL 2021: पहिल्या सामन्याआधी चेन्नईला धक्का! 'हा' दिग्गज दुखापतग्रस्त

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये 19 सप्टेंबर रोजी पुन्हा सुरू होणार आहे.
IPL 2021: पहिल्या सामन्याआधी चेन्नईला धक्का! 'हा' दिग्गज दुखापतग्रस्त
IPL 2021: पहिल्या सामन्याआधी चेन्नईला धक्का! 'हा' दिग्गज दुखापतग्रस्तTwitter/@IPL

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) चा दुसरा टप्पा यूएईमध्ये 19 सप्टेंबर रोजी पुन्हा सुरू होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सशी (MI) सामना करणार आहे. दरम्यान पहिल्या सामन्याआधी सीएसकेला मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचा अनुभवी सलामीवीर फाफ डू प्लेसिस (FAF- Du-Plessis) गंभीर जखमी झाला आहे.

फाफ डु प्लेसिस कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL 2021) मध्ये खेळत होता आणि एका सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती. फाफ डु प्लेसिस रविवारी 28 व्या सीपीएलच्या सामन्यात सेंट लुसिया किंग्स विरूद्ध बार्बाडोस रॉयल्स सामन्याआधी कंबरेला दुखापत झाली. यामुळे तो सामनाही खेळू शकला नाही. याच कारणामुळे आंद्रे फ्लेचरने सेंट लुसिया किंग्जचे कर्णधारपद भूषवले, पण या सामन्यात प्लेसिसच्या संघाचा पराभव झाला.

IPL 2021: पहिल्या सामन्याआधी चेन्नईला धक्का! 'हा' दिग्गज दुखापतग्रस्त
IND vs ENG: मालिकेचा निकाल लागला; 'या' दिवशी होणार पाचवा सामना

सध्या, फाफ डु प्लेसिसच्या दुखापतीची गंभीरता याबद्दलची माहिती पूर्णपणे उघड झालेली नाही, परंतु सामन्याआधी नाणेफेक करताना आंद्रे फ्लेचरने सांगितले होते की फाफ डू प्लेसिसला कंबरेची दुखापत आहे आणि म्हणूनच तो सामना खेळला नाही. दुखापतीपूर्वी उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या फाफ डू प्लेसिसने याआधी एका सामन्यात शानदार नाबाद शतक झळकावले होते. सेंट लुसिया किंग्सने पाच सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे.

फाफ डू प्लेसिसच्या दुखापतीमुळे सेंट लुसियाच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र फाफ डु प्लेसिसच्या दुखापतीमुळे यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांमध्ये त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंबरेची जखमा बरी होण्यास बराच वेळ लागतो. अशा परिस्थितीत तो लवकरच तंदुरुस्त होईल की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आयपीएल 2021 बद्दल बोलायचे तर, फाफ डू प्लेसिसने या हंगामात सीएसकेसाठी 7 सामन्यांमध्ये 64.00 च्या सरासरीने आणि 145.45 च्या स्ट्राइक रेटने 320 धावा केल्या आहेत. त्याने 7 सामन्यांमध्ये चार अर्धशतके केली होती. या हंगामातील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 95 होती. फाफ डु प्लेसिस आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण खेळी करत आहे. तो एकदा खेळपट्टीवर सेट झाला की वेगाने धावा काढण्यासाठी ओळखला जातो आणि संघाला डावाला चांगली सुरुवात करून देतो.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com