IPL 2021: ...म्हणून 'क्रिस वोक्स'ने घेतली IPL मधून माघार!

32 वर्षीय ख्रिस वोक्स हा इंग्लंडच्या त्या खेळाडूंपैकी एक होता जो गेल्या शुक्रवारी भारताची पाचवी कसोटी खेळण्यास नकार दिल्याने निराश झाला होता
IPL 2021: ...म्हणून 'क्रिस वोक्स'ने घेतली IPL मधून माघार!
IPL 2021: ...म्हणून 'क्रिस वोक्स'ने घेतली IPL मधून माघार!Saam Tv

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने (Chris Woakes) इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) दुसऱ्या टप्यातून म्हणजेच आयपीएलच्या 14 व्या हंगामातून माघार घेण्याचं कारण दिलं आहे. तो 2019 च्या आयपीएलमध्येही खेळला नव्हता, कारण तो म्हणतो की यावेळीही परिस्थिती 2019 सारखी आहे, जिथे एकापाठोपाठ एक स्पर्धा आहेत, ज्या इंग्लंडसाठी खूप महत्वाच्या आहे. ख्रिस वोक्स आयपीएल 2021 साठी दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता.

IPL 2021: ...म्हणून 'क्रिस वोक्स'ने घेतली IPL मधून माघार!
कुस्तीच्या पंढरीत शड्डूचा आवाज घुमणार; मैदान आयाेजनाने मल्ल खूष

32 वर्षीय ख्रिस वोक्स हा इंग्लंडच्या त्या खेळाडूंपैकी एक होता जो गेल्या शुक्रवारी भारताची पाचवी कसोटी खेळण्यास नकार दिल्याने निराश झाला होता, परंतु जॅानी बेअरस्टो आणि डेव्हिड मलाननंतर त्याने संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या आयपीएलमधून माघार घेतली होती. ऑक्टोबरमध्ये टी -20 विश्वचषकासाठी इंग्लंडच्या संघात सामील होण्याच्या त्याच्या इच्छेमुळे आणि थोड्याच दिवसात सुरु होणाऱ्या अॅशेस दौऱ्यामुळे, वोक्सने आयपीएल खेळायला नकार दिला आहे. वोक्सने आपल्या कुटूंबासोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आहे.

एका माध्यमाशी बोलताना, ख्रिस वोक्स म्हणाला "विश्वचषक संघात माझा समावेश झाला आहे, मला माहित नव्हते की माझा समावेश होणार आहे. विशेषतः काही महिन्यांपूर्वी, आयपीएलचे वेळापत्रक पुन्हा ठरले आहे. टी 20 विश्वचषक आणि अॅशेससह मालिका एकापाठोपाठ आहेत त्यामुळे आयपीएल खेळणं माझ्यासाठी अती होईल. एक विश्वचषक आणि एक अॅशेस दौरा, हा उन्हाळी हंगाम 2019 च्या उन्हाळी हंगामा इतकाच मोठा आहे. कोरोनामुळे परिस्थीती सामान्य नाहिये, पण क्रिक्रेटच्या बाजूने परिस्थीती अतीशय रोमांचक आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com