IPL 2021: ''भारतीय संघातील 1 कोरोना पॉझिटिव्ह केस IPL धोक्यात आणेल''

कोविड -19 (COVID-19) चे सावट पुन्हा इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) वर घिरट्या घालत आहेत.
IPL 2021: ''भारतीय संघातील 1 कोरोना पॉझिटिव्ह केस IPL धोक्यात आणेल''
IPL 2021Twiiter/ @IPL

कोविड -19 (COVID-19) चे सावट पुन्हा इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) वर घिरट्या घालत आहेत. आयपीएलचा दुसरा टप्पा (IPL 2021 Phase 2) अद्याप सुरू झालेला नाही परंतु संघांमध्ये वाढणााऱ्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. यावेळी इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या मालिकेमध्ये सदस्य कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. सध्या दुबई आणि अबू धाबी मधील आयपीएल फ्रँचायझी संबंधीत परिस्थितीमुळे चिंतेत आहेत. आयपीएल संघाचे चार कर्णधार आणि संघांचे खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये खेळत आहेत. त्यामुळे त्या खेळाडूंची चिंता आयपीएल फ्रँचायझीला आहे. माध्यमांनी दुबईस्थित फ्रँचायझी अधिकाऱ्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी आपली भीती व्यक्त केली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे.

IPL 2021
कुस्तीपटूचा मान मुरगळल्याने मैदानावरच तडफडून मृत्यू; पाहा Video

भारतीय संघातील एक पॉझिटिव्ह केसही आयपीएल धोक्यात आणू शकते. हे सर्व खेळाडू एकत्र आहेत, त्यांना चार्टर्ड विमानाने यूएईला पोहोचायचे आहे. हे सर्व अव्वल खेळाडू आहेत आणि प्रत्येक खेळाडू फ्रँचायझीसाठी आवश्यक आहेत. कोणी पॉझिटिव्ह आले तर ते संपूर्ण आयपीएलसाठी धोकादायक आहे. युएईमधे फ्रँचायझी जवळजवळ तीन आठवड्यांपासून तळ ठोकून आहेत. बीसीसीआयने (BCCI) घालून दिलेल्या कोविड-१९ प्रोटोकॉलच्या (COVID-19 Protocol) अनुषंगाने त्यांनी स्वतःचे सुरक्षित बायो-बबल तयार केले आहेत. भारतीय, इंग्लंड आणि इतर परदेशी खेळाडू या बायो-बबलमध्ये सामील होणार आहेत.

आरसीबीचा कर्णधार विराट कोहली (RCB Captain Virat Kohli), मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), दिल्ली कॅपिटल्सचा ऋषभ पंत, पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल आणि इतर 20 खेळाडू भारत आणि इंग्लंड मालिकेचा भाग आहेत. या सर्व खेळाडूंना मालिका पूर्ण झाल्यानंतर 5 दिवसांनी आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीला जावे लागणार आहे. हे बबल-टू-बबल ट्रान्सफर असणार आहे. बीसीसीआयने घालून दिलेल्या नियमानूसार प्रत्येक खेळाडूला संपूर्ण मार्गदर्शक सुचनांते पालन करावे लागणार आहे. परंतू आयपीएल प्रँचायझींना खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह येण्याची चिंता सतावत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com