IPLमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत फक्त 1 भारतीय

आयपीएल 2021 (IPL 2021) चे उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. याआधी, या हंगामाचे 29 सामने भारतात खेळले गेले होते.
IPLमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत फक्त 1 भारतीय
IPLमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत फक्त 1 भारतीयTwitter

आयपीएल 2021 (IPL 2021) चे उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. याआधी, या हंगामाचे 29 सामने भारतात खेळले गेले होते. जिथे कोविड 19 (Coronavirus) च्या प्रादुर्भावामुळे लीग 4 मे रोजी रद्द करण्यात आली होती. आयपीएल पुन्हा सुरु होतीये म्हणजे क्रिक्रेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. आयपीएल 2021 च्या उर्वरित 31 सामन्यांमध्ये, कोणता फलंदाज आता शतक झळकावतो, हे पाहण्यासारखे असेल. पण आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात कोणत्या फलंदाजांनी वेगवान शतक झळकावले आहे ते आपण पाहूयात.

ख्रिस गेलच्या नावावर आयपीएलचे सर्वात वेगवान शतक

आयपीएलमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या (Chirs Gayle) नावावर आहे. ख्रिस गेलने 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध आरसीबीकडून खेळताना हा पराक्रम केला होता. या सामन्यात गेलने 66 चेंडूत 175 धावा केल्या ज्यामध्ये त्याने 17 षटकार आणि 13 चौकार मारले होते. या खेळीदरम्यान त्याने 30 चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते.

IPLमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत फक्त 1 भारतीय
IND vs ENG: मालिकेचा निकाल लागला; 'या' दिवशी होणार पाचवा सामना

त्याचबरोबर या लीगमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावण्याच्या बाबतीत युसुफ पठाण (Yusuf Pathan) दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 2010 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 37 चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. युसूफ पठाण त्यावेळी राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. त्या सामन्यात राजस्थान संघाला 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागला. नंतर युसूफ शतक झळकावून बाद झाला आणि राजस्थान संघाने 7 विकेटवर 208 धावा केल्या आणि त्यांचा 4 धावांनी पराभव झाला. आयपीएलमधील तिसरे सर्वात जलद शतक 2013 मध्ये डेव्हिड मिलरने आसीबीविरुद्ध 38 चेंडूत केले होते.

आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारे टॉप 6 फलंदाज-

30 चेंडू - ख्रिस गेल विरुद्ध PWI - 2013

37 चेंडू - युसूफ पठाण वि MI- 2010

38 चेंडू - डेव्हिड मिलर विरुद्ध आरसीबी - 2013

42 चेंडू - अॅडम गिलख्रिस्ट विरुद्ध MI - 2008

43 चेंडू - एबी डिव्हिलियर्स वि GL - 2016

43 चेंडू - डेव्हिड वॉर्नर विरुद्ध KKR - 2017

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com