IPL 2022 Auction: 10 संघांच्या रडारवर 10 'मोस्ट वाँटेड' खेळाडू

आयपीएल 2022 चा मेगा लिलाव फक्त तीन आठवडे दूर आहे आणि 10 आयपीएल फ्रँचायझींनी आपले खेळाडू शॉर्टलिस्ट केले आहेत.
IPL 2022
IPL 2022Saam TV

आयपीएल 2022 चा मेगा लिलाव फक्त तीन आठवडे दूर आहे आणि 10 आयपीएल फ्रँचायझींनी आपले खेळाडू शॉर्टलिस्ट केले आहेत. पण इशान किशन, श्रेयस अय्यर, क्विंटन डीकॉक आणि शाहरुख खान यांसारखे काही खेळाडू आपल्या संघात घेण्यासाठी 10 फ्रँचायझी उत्सुक आहेत. आयपीएल 2022 मध्ये कोणत्या दहा खेळाडूंना जास्त मागणी असणार आहे ते जाणून घेऊयात.

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या संघाने इशान किशनला संघात रिटेन केले नाही. त्यामुळे किशनला संघात घेण्यासाठी प्रत्येक फ्रँचायझी प्रयत्न करणार आहे. इशान किशन हा भविष्यात कर्णधार देखील बनू शकतो. त्याचबरोबर तो चांगला विकेटकिपर फलंदाज आहे, सलामिला त्याचबरोबर मधल्या फळीतही तो फलंदाजी करु शकतो.

IPL 2022
IPL 2022 Auction: स्टार खेळाडूंच्या बेस प्राईस ठरल्या; वाचा संपूर्ण यादी

श्रेयस अय्यर

दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार असलेल्या श्रेयश अय्यरला दिल्लीच्या संघाने रिटेन केलेले नाहीये. RCB, पंजाब किंग्ज आणि KKR हे संघ त्याच्याकडे कर्णधार म्हणून पाहत आहेत. श्रेयश हा चांगल्या फलंदाजीसाठी त्याचबरोबर एक उत्कृष्ठ कर्णधार म्हणूनही चांगला आहे. त्यामुळे सात फ्रँचायझी त्याला संघात घेण्यासाठी प्रयत्न करतील.

क्विंटन डी कॉक

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा फलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये त्याने विकेटकिपर फलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघात कायम ठेवलेले नाही. पण लिलावात संघ पुन्हा एकदा त्याला आपल्या संघात घेण्याची शक्यता आहे.

शाहरुख खान

तामिळनाडूचा धडाकेबाज फलंदाज म्हणून नावारुपाला आलेल्या शाहरुख खानला पंजाब किंग्सच्या संघाने रिटेन केलेले नाही. संघाला हा फार मोठा धक्का असणार आहे, कारण शाहरुखने विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली ट्राफीमध्ये आपल्या फलंदाजीतील योग्यता सिद्ध केली आहे. म्हणून लिलावात सर्वांच्या नजरा त्याच्यावर असणार आहेत.

IPL 2022
IPL 2022 Auction: ठरलं! हार्दिक, राशिद, गिलला 'या' संघाकडून मोठी लॉटरी!

दीपक चहर

चहरची अष्टपैलू क्षमता श्रीलंका मालिकेत समोर आली आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ती सिद्ध केली. वेगवान गोलंदाज आणि फलंदाज म्हणून समोर आलेल्या खेळाडूवर 10 फ्रँचायझी आपले लक्ष केंद्रित करतील. दिपक चहरने आपली गोलंदाजीमधील योग्यता मागच्या काही हंगामात सिद्ध केली आहे. तो चेन्नई सुपर किंग्सच्या संघात होता.

कागिसो रबाडा

दक्षिण आफ्रिकेच्या या वेगवान गोलंदाजाने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्याला रिटेन न करून चूक केली असली तरी इतर सर्व फ्रँचायझी त्याला मिळवण्यासाठी आतुर असणार आहेत. खरं तर, तो आयपीएल 2022 मधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांपैकी तो एक असू शकतो.

हर्षल पटेल

आयपीएल 2021 पर्पल कॅप विजेत्या हर्षल पटेलला लिलावापूर्वी आरसीबीने सोडले आहे. पण हर्षल पटेलवर त्याच्या कौशल्यामुळे सर्व फ्रँचायझींचे लक्ष्य असेल. IPL 2021 मध्ये 32 विकेट्स घेऊन, त्याने भारतीय खेळपट्ट्यांवर निर्णायक ठरणाऱ्या स्लोवर चेंडूंवर आपले प्रभुत्व दाखवले आहे.

शिखर धवन

शिखर धवनने आपली फलंदाजीतील योग्यता वारंवार सिद्ध केली आहे. आयपीएलमधील सातत्यपूर्ण फलंदाजांपैकी एक तो आहे. तो ओपनिंग स्लॉटसाठी सर्व आयपीएल फ्रँचायझींच्या लक्ष्यांपैकी एक असणार आहे.

डेव्हिड वॉर्नर

मिस्टर कॉन्स्टंट म्हणून ओळख मिळवलेल्या वॉर्नरने आयपीएल 2021 आपला फॉर्म गमावला होता. एसआरएचने त्याला केवळ कर्णधारपदावरून काढून टाकले नाही, तर त्याला संघातून वगळण्यात आले होते आणि अखेरीस त्याला संघाने रिटेनही केले नाही. पण या ऑस्ट्रेलियन फलंदाजावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. PBKS, KKR आणि RCB त्याला कर्णधारपदाचा पर्याय म्हणून लक्ष्य करण्याची शक्यता आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com