IPL 2022: BCCI चा 'प्लॅन बी'; संपुर्ण स्पर्धा महाराष्ट्रात घेण्याचा विचार

महाराष्ट्र सरकारच्या नव्या नियमावलीनुसार, “आधीच नियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा वगळता क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात येणार आहेत.
IPL 2022
IPL 2022Twitter/ @IPL

देशात कोरनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. हेच लक्षात घेऊन बीसीसीआय आता प्लॅन बी मध्ये संपूर्ण आयपीएल यंदा महाराष्ट्रात आयोजित करण्याचा विचार करत आहे. TOI च्या माहितीनुसार बोर्डाकडे मुंबईत तीन ठिकाणे आहेत, ती म्हणजे वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि पुण्याजवळील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम (Maharashtra Cricket Association Stadium) याठिकाणी बोर्ड आयपीएल (IPL 2022) आयोजीत करण्याचा विचार करत आहे. (IPL 2022 News In Marathi)

“विश्वसनीय सुत्रांनी TOI ला माहिती दिली की, “5 जानेवारी रोजी, हेमांग अमीन (BCCI चे अंतरिम सीईओ आणि IPL चे मुख्य कार्यकारी अधिकारी) यांनी विजय पाटील (मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष) यांना एमसीएच्या शिखर परिषदेच्या बैठकीत या संदर्भात विचारले. दरम्यान त्यांच्याशी संपर्कही साधला आहे. त्यानंतर काही दिवसांनी अमीन आणि पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची देखील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. बीसीसीआयच्या या प्रस्तावाला पवारांनी हिरवा कंदील दिला आहे. या आठवड्यात किंवा पुढील 10 दिवसांत ते बीसीसीआय आणि एमसीएचे अधिकारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज्याचे प्रमुख आणि सचिव देबाशीष चक्रवर्ती यांची भेट घेऊन यासंदर्भात आवश्यक परवानग्यांची व्यवस्था करणार आहेत. या आघाडीवर कोणतीही अडचण नसावी, कारण स्पर्धा प्रेक्षकांशिवाय कठोर बायो बबलमध्ये खेळवली जाणार आहे, आणि खेळाडू आणि अधिकारी यांची वारंवार चाचणी घेतली जाणार आहे.” (IPL 2022 In Maharashtra? )

IPL 2022
विकेट घेताच करतो हवाई दलाला सलाम; कोण आहे हा 'जवान', गाजवतोय क्रिकेटचे मैदान

सूत्रांनी स्पष्ट केले की महाराष्ट्रात (शनिवारी 40,925 नवीन प्रकरणे) आणि मुंबई (20,971 नवीन प्रकरणे) कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाली असली तरीही, राज्य सरकारने शनिवारी कोविड निर्बंधांवरील आपल्या नव्या आदेशात काही नियमांचे काटेकोर पालन करून क्रीडा स्पर्धांना परवानगी दिली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या नव्या नियमावलीनुसार, “आधीच नियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा वगळता क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात येणार आहेत

1: गर्दी नाही,

2: सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी बायो-बबल.

3: भारत सरकारचे नियम सर्व सहभागी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत खेळाडूंसाठी लागू होतील.

4: RT-PCR/RAT चाचणी प्रत्येक तिसर्‍या दिवशी सर्व खेळाडू आणि अधिका-यांसाठी याच कारणामुळे राज्य सरकारने 2022 महिला आशिया चषक महाराष्ट्रात आयोजित करण्यास परवानगी दिली आहे.

सहसा आयपीएल होम आणि अवे फॉरमॅटमध्ये आयोजित केले जाते, परंतु भारतामध्ये कोविड प्रकरणांमध्ये जबरदस्त वाढ होत आहे. शनिवारी देशात कोविड-19 चे 1,41,986 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोविडच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे, बीसीसीआयला 5 जानेवारीपासून होणाऱ्या सर्व देशांतर्गत स्पर्धा पुढे ढकलणे भाग पडले.

संपूर्ण लीग मुंबईतील फक्त तीन स्टेडियम आणि जवळच्या पुण्यातील एका ठिकाणापुरती मर्यादित केल्याने बीसीसीआयला स्पर्धेदरम्यान जास्त हवाई प्रवास करावा लागणार नाही, ज्यामुळे गेल्या वर्षी बायो-बबलमध्ये काही खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. एका सूत्राने सांगितले की, “आतापर्यंत तरी आयपीएल भारतात आयोजित करण्याची योजना आहे. परंतु, भविष्यात जर महाराष्ट्राचा पर्यायही नाकारला गेला तर बीसीसीआयला आयपीएल परत यूएईमध्ये खेळवावं लागू शकतं.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com