IPL 2022: गुरु-चेला आमने सामने, कोण ठरणार वरचढ?

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील या संघाचा आलेख जर पाहिला तर संघ एक सामना जिंकतो तर दुसऱ्या सामन्यात हरतो.
CSK vs RCB
CSK vs RCBSaam TV

रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) यांच्यात सामना होणार आहे. आजच्या दिवसातील डबल हेडरचा दुसरा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. कर्णधार म्हणून हा सामना गुरू आणि चेला यांच्यात होणार आहे. महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) की ऋषभ पंत (Rishabh Pant), कोण जिंकणार हे पाहावे लागेल. खेळपट्टी कशी असेल आणि दोन्ही संघांचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला ते जाणून घेऊया.

दिल्लीच्या संघाला आता विजय गरजेचा आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील या संघाचा आलेख जर पाहिला तर संघ एक सामना जिंकतो तर दुसऱ्या सामन्यात हरतो. या संघाने शेवटचा सामना जिंकला होता. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत 10 सामन्यांत 5 वेळा विजय मिळवला आहे, तर 5 सामने गमावले आहेत.

चेन्नई सुपर किंग्स

जडेच्या नेतृत्वात संघाने यंदाचा हंगामा खेळायला सुरुवात केला. आता एमएस धोनीच्या हातात परत कर्णधाराची धुरा आली आहे. परंतु प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आता कुठलीही संधी चेन्नईच्या संघाला नाही. सीएसकेने 10 सामने खेळले असून त्यापैकी 7 सामने ते हरले आहेत आणि केवळ 3 सामने जिंकले आहेत.

या मोसमात आतापर्यंत डीवाय पाटील स्टेडियमवर 15 सामने झाले आहेत. नाणेफेकीबद्दल बोलायचे तर येथे प्रथम गोलंदाजी करणे हा एक चांगला पर्याय असेल, येथे लक्ष्याचा पाठलाग करणे योग्य ठरेल. दव दुसऱ्या डावात प्रभावी ठरेल आणि फलंदाजी सोपी होईल. खेळपट्टी वेगवान आणि फिरकी गोलंदाजांना मदत करेल. दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यापूर्वी 26 वेळा आमनेसामने आले आहेत. सीएसकेने 16 वेळा, तर दिल्लीने 10 वेळा विजय मिळवला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com