IPL 2022: चेन्नईसाठी आजचा सामना 'करो या मरो'; RCB ची हार म्हणजे...

चेन्नई सुपर किंग्जच्या संघाची कमान आता एमएस धोनीच्या (MS Dhoni) खांद्यावरती आली आहे.
IPL 2022: चेन्नईसाठी आजचा सामना 'करो या मरो'; RCB ची हार म्हणजे...
RCB vs CSKSaam TV

चेन्नई सुपर किंग्जच्या संघाची कमान आता एमएस धोनीच्या (MS Dhoni) खांद्यावरती आली आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघात नवचैतन्य निर्माण झाले आहे. संघाची जबाबदारी धोनीकडे आल्यामुळे आता चाहत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. धोनीने संघाची जबाबदारी स्वीकारताच संघाने मुंबईच्या संघावरती विजय मिळवला. महत्त्वाचं म्हणजे चेन्नईला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी उर्वरीत सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. आज सीएसकेचा सामना फॅफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीशी होणार आहे.

धोनी आणि CSK यांची आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात मोठी परीक्षा असणार आहे. आज जर चेन्नईचा पराभव झाला तर संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणार आहे. आरसीबीसाठीही हा विजय महत्त्वाचा असणार आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघ सध्या 10 सामन्यांमध्ये 5 विजयांसह आयपीएल गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. आजचा सामना जर संघ हारला तर त्यांनाही प्लेऑफमध्ये पोहोचणे अवघड जाणार आहे.

RCB vs CSK
ICC T20 Rankings: रोहितच्या नेतृत्वात भारताची बाजी; जाणून घ्या संपुर्ण क्रमवारी

CSK ला गुणतालिकेत टॉपर असलेल्या गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांना मागे टाकणे आवश्यक आहे. दोन्हीही संघ तूफान फॉर्ममध्ये खेळत आहेत. आरसीबीच्या संघाला मागच्या सामन्यात मुंबईकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

पुण्यातील वानखेडे स्टेडीयमवरती हा सामना खेळवला जाणार आहे. पुण्यातील खेळपट्टी ही फलंदाजांना पोषक समजली जाते. चेन्नईच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा सलामवीर ऋतूराज गायकवाड जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आणि आरसीबीच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे विराट कोहली फॉर्ममध्ये आला आहे.

संभाव्य संघ

RCB: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवुड, मोहम्मद सिराज.

CSK: रुतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायुडू, सिमरजीत सिंग, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकीपर), मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, महेश थेक्षाना, मुकेश चौधरी

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.