"आणखी २ मुलं जन्माला घाल"; फॉर्मशी झुंजणाऱ्या विराटला वॉर्नरचा अजब सल्ला

Virat kohli : ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर विराटला लवकर फॉर्ममध्ये येण्याचा सल्ला दिला आहे.
"आणखी २ मुलं जन्माला घाल"; फॉर्मशी झुंजणाऱ्या विराटला वॉर्नरचा अजब सल्ला
Virat Kohli Latest Marathi News, David Warner News, David Warner's advice to Virat KohliSaam Tv

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा सध्या खराब फॉर्म सुरू आहे. रनमशीन म्हणून ओळखल्या विराटला वर्षभरापासून वनडे तसेच कसोटी सामन्यांत चांगली कामगिरी करता आली नाही. यंदाच्या आयपीएल (IPL 2022) सामन्यांतही विराटच्या बॅटमधून धावा निघत नाहीये. विराटचा खराब फॉर्म हा त्याच्या चाहत्यांसाठी चिंतेचा विषय ठरतो आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर (Devid Warner) विराटला लवकर फॉर्ममध्ये येण्याचा सल्ला दिला आहे. (Virat Kohli Latest Marathi News)

Virat Kohli Latest Marathi News, David Warner News, David Warner's advice to Virat Kohli
धोनी बाद होताच कोहलीने दिली शिवी; ट्वीटरवर चाहत्यांनी विराटला झापलं

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडून सलामीला येणाऱ्या वॉर्नरने विराट लवकर फॉर्ममध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच एका क्रिडावाहिनीशी बोलताना त्याने विराटला फॉर्ममध्ये येण्यासाठी अजब सल्ला देखील दिला आहे. कोहलीच्या फॉर्मबद्दल बोलताना वॉर्नर म्हणाला की, विराट कोहलीने कठीण काळात त्याच्या मूलभूत गोष्टींवर ठाम राहिलं पाहिजे. मी स्वतः देखील या टप्प्यातून गेलो आहे, 'विराट तू अजून आणखी २ मुलांना जन्म दे, आयुष्य आणि क्रिकेटचा आनंद घे'. असा मजेशीर सल्लाही वॉर्नरने दिला आहे.

पुढे बोलताना डेव्हिड वॉर्नर म्हणाला, 'जगातील प्रत्येक खेळाडूसोबत असं घडतं. फॉर्म हा तात्पुरता विषय आहे आणि क्लास हा कायमस्वरूपी मानला जातो. काहीवेळा तुम्हाला परत फॉर्म मिळवण्यासाठी वाईट काळ पार करावा लागतो. मूलभूत गोष्टींना चिकटून रहा. विराटने अजून काही मुलांना जन्म द्यावा आणि प्रेमाचा आनंद घ्यावा. असा मजेशीर सल्लाही वॉर्नरने विराटला दिला आहे. विराट कोहलीने 2017 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) लग्न केले. त्याला एक मुलगी देखील आहे.

दरम्यान, IPL 2022 मध्ये, विराटने १० सामन्यांमध्ये २१ च्या सरासरीने आणि ११६च्या अत्यंत सुमार स्ट्राइक रेटने फक्त १८६ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषक जवळ आल्याने विराट कोहली अशाप्रकारे झगडतोय ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. यापूर्वी आरसीबीचा माजी खेळाडू आणि विराटचा माजी सहकारी सहकारी एबी डीविलियर्सने त्याच्या मानसिकतेला जबाबदार ठरवलं होतं. कोहलीला खराब फॉर्ममधून पुनरागमन करणं आव्हानात्मक असल्याचंही एबी डिव्हिलियर्सने मत व्यक्त केलं होतं.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com