
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) यंदाच्या हंगामामध्ये अनेक रंजक गोष्टी घडत आहेत. बुधवारी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात रोमांचक सामना झाला. सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला आणि अखेरीस बेंगळुरुने 13 धावांनी विजय मिळवला. या सामन्यामध्ये अशी घटना कॅमेऱ्यात कैद झाली, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (CSK vs RCB Prapose Viral Video)
सामन्यादरम्यान एका मुलीने आरसीबीच्या एका फॅनला भर स्टँडमध्ये प्रेक्षकांसमोर प्रपोज केले. मुलाने हो म्हटल्यावर मुलीनेही त्याला अंगठी घालायला लावली. त्यानंतर दोघांनी मिठी मारली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका वापरकर्त्या म्हटले आहे- मी आयपीएल पाहत आहे की विवाहसोहळा.
चेन्नईच्या डावात ही घटना घडली
या प्रपोजची घटना चेन्नईच्या डावात घडली. चेन्नईच्या संघाने 3 बाद 79 धावा केल्या होत्या. डेव्हॉन कॉनवे आणि मोईन अली क्रीजवर होते. यादरम्यान लाल रंगाचा टॉप घातलेली मुलगी स्टँडमध्ये उठली आणि गुडघ्यावर बसून तिने शेजारी उभ्या असलेल्या मुलाला प्रपोज केले. मुलाने आरसीबीची जर्सी घातली होती. त्यानेही लगेच हो म्हटलं.
बंगळुरू संघाने चेन्नईचा 13 धावांनी केला पराभव
या सामन्यात चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 8 गडी गमावून 173 धावा केल्या. महिपाल लोमररने 27 चेंडूत 42 तर कर्णधार डू प्लेसिसने 22 चेंडूत 38 धावा केल्या. तर महिष थिक्ष्णाने ३ बळी घेतले.
प्रत्युत्तरात चेन्नईचा संघ 8 गडी गमावून 160 धावाच करू शकला. डेव्हन कॉनवेने 37 चेंडूत 56 धावा केल्या, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. मोईन अलीने 34 आणि ऋतुराज गायकवाडने 28 धावा केल्या. याशिवाय संघाच्या एकाही फलंदाजाला 20 धावांचा पल्ला गाठता आला नाही. वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने 3 बळी घेतले, तर त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
Edited By: Pravin Dhamale
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.