'इथे दुबळ्यांना जागा नाही'; गंभीरने घेतली लखनौच्या संघाची शाळा, पाहा Video

कालच्या सामन्यातील पराभव लखनौच्या संघाच्या जिव्हारी लागला आहे. सामन्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंची शाळा घेतानाचा Video Viral झाला आहे.
Gautam Gambhir
Gautam GambhirSaam TV

IPL 2022 मध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सच्या संघाला गुजरात टायटन्सविरुद्ध (Lucknow Super Giants vs Gujarat Titans) लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने 20 षटकांत 144 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात लखनौ सारखा बलाढ्य संघ 82 धावांत गारद झाला. मोठी गोष्ट म्हणजे लखनौ सुपरजायंट्सला 14 षटकेही पुर्ण खेळता आली नाहीत. संघाचे स्टार फलंदाज केएल राहुल, क्विंटन डी कॉक लवकर बाद झाले. या पराभवाने लखनौ सुपरजायंट्सच्या संपुर्ण व्यवस्थापनाला धक्का बसला आहे. खासकरून मेंटर गौतम गंभीर (Gautam Gambhir) खूप संतापलेला दिसत होता. सामन्यानंतर गौतम गंभीरने लखनौ सुपरजायंट्सच्या खेळाडूंची शाळा घेतली.

सामना संपल्यानंतर गौतम गंभीरने ड्रेसिंग रूममध्ये संपूर्ण टीमशी संवाद साधला. संघाने काय चूक केली? गौतम गंभीरने खेळाडूंना सांगितले की, सामना हरण्यात काही नुकसान नाही परंतु पराभव सहज स्वीकारणे पूर्णपणे चुकीचे आहे. लखनौ सुपरजायंट्सने गौतम गंभीरचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

मोठ्या पराभवानंतर गौतम 'गंभीर' झाला

व्हिडिओमध्ये गौतम गंभीर म्हणाला, ''खेळात मॅच जिंकतो आणि हरतो, एक टीम जिंकेल आणि दुसरी हरेल. पण हार मानणे पूर्णपणे चुकीचे आहे. मला वाटतं आपण सोडून दिलंय. आपण कमकुवत झालो होतो आणि आयपीएलसारख्या स्पर्धेत दुबळ्यांना स्थान नाही.'' गौतम गंभीर पुढे म्हणाला, ''आपण या स्पर्धेत अनेक संघांना पराभूत केले. आपण चांगले क्रिकेट खेळलो पण आज आपण खेळाची समज गमावून बसलो होतो जी खूप महत्वाची आहे. गुजरातने चांगली गोलंदाजी केली आणि त्यांच्याकडून तेच अपेक्षित होते. आपण या स्पर्धेत जागतिक दर्जाच्या खेळाडूंसोबत खेळत आहोत, त्याचा आपल्याला सराव होतो.

लखनौने गुजरातसमोर शरणागती पत्करली

पुण्यातील एमसीए स्टेडियमवर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 144 धावा केल्या. खेळपट्टी पाहून सर्वांनाच ही धावसंख्या कमी वाटली, पण त्यानंतर दुसऱ्या डावात खेळपट्टी रुख बदलला. गुजरातच्या भेदक माऱ्यासमोर लखनौने केएल राहुल आणि डी कॉकच्या विकेट्स गमावल्या. यानंतर लखनौची मधली फळीने गुजरातच्या गोलंदाजांसमोर नांग्या टाकल्या. दीपक हुडाने 27 धावा केल्या पण रशीद खान, आर साई किशोर, यश दयाल आणि मोहम्मद शमी यांनी लखनौला 13.5 षटकात गारद केले. या विजयासह गुजरात टायटन्सन प्लेऑफमध्ये जाणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com