IPL 2022: एक विजय अन् गुजरात प्लेऑपमध्ये; पंजाबला हार न परवडणारी

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2022) मंगळवारी गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज (GT vs PBKS) आमने-सामने येणार आहेत.
IPL 2022- GT vs PBKS
IPL 2022- GT vs PBKS Saam TV

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2022) मंगळवारी गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज (GT vs PBKS) आमने-सामने येणार आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स लक्ष प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करण्याकडे असेल. दुसरीकडे पंजाबला विजय मिळवून आपलीही दावेदारी करायची आहे. पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या गुजरातच्या संघाला पराभूत करणे सोपे राहिलेले नाही. त्यांनी नऊपैकी आठ सामने जिंकले आहेत आणि आज सलग सहाव्या विजयाची नोंद केल्याने ते प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनतील.

गुजरातच्या या दमदार कामगिरीचे कारण म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही दमदार पुनरागमन करणे. राहुल तेवतिया, डेव्हिड मिलर, रशीद खान किंवा कर्णधार हार्दिक पांड्या असोत, या सर्वांनी आतापर्यंतच्या स्पर्धेत मॅच विनिंग कामगिरी केली आहे. एक खेळाडू अपयशी ठरला तर त्याची जबाबदारी दुसरा घेताना पाहायला मिळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्धच्या विजयानंतर हार्दिक म्हणाला होता की, कठीण परिस्थितीतही ते काय करू शकतात हे खेळाडूंनी दाखवून दिले आहे हे या संघाचे सौंदर्य आहे. त्यासाठी आम्ही त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.

IPL 2022- GT vs PBKS
पृथ्वी शॉ ने अवघ्या 22 व्या वर्षी खरेदी केले घर; किंमत ऐकून थक्क व्हाल

मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सने 9 सामन्यांत 4 वेळा विजय मिळवले आहेत आणि 5 वेळा पराभव पत्करावा लागला आहे. मागील सामन्यात पंजाब किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सकडून 20 धावांनी पराभव झाला होता. संघाच्या फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही ती धार दिसलेली नाही. इथून प्रत्येक सामना पंजाबसाठी महत्त्वाचा आहे. संघाचे सध्या 8 गुण आहेत.

गुजरात टायटन्स संघ

अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, गुरकीरत सिंग, बी साई सुदर्शन, शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), राहुल तेवतिया, विजय शंकर, मॅथ्यू वेड, रहमानउल्ला गुरबाज, ऋद्धिमान साहा, अल्झारी जोसेफ, दर्शन नळकांडे, डॉमिनिक ड्रेक्स, जयंत यादल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, नूर अहमद, प्रदीप सांगवान, राशिद खान, रवी श्रीनिवासन, साई किशोर, वरुण आरोन, यश दयाल.

पंजाब किंग्ज संघ

शिखर धवन, मयंक अग्रवाल, अर्शदीप सिंग, कगिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, ईशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा, ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, हृतिक चॅटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नॅथन एलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्षे, बेनी हॉवेल.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com