IPL 2022: गुजरात टायटन्सला मिळाले २० कोटी; कोणाला किती मिळाले पैसे?

काल गुजरातच्या विजयानंतर खेळाडुूंवर बक्षिसांचा पाऊस पडला आहे.
IPL 2022
IPL 2022Saam Tv

मुंबई: हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ मध्ये दमदार कामगिरी करत आयपीएलच्या 2022 (IPL 2022 ) ट्राफीवर आपले नाव कोरले. गुरातने ७ गडी राखून राजस्थानचा पराभव करत अंतिम सामना जिंकला. या विजयानंतर खेळाडूंनी जल्लोष केला. या सामन्यानंतर गुजरात टायटन्सवर बक्षिसांचा पाऊस पडला आहे.

सामन्यानंतर खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. आपीएल हंगाम १५ च्या विजेता असलेल्या गुजराट टायटन्सला २० कोटी रुपये, तर उपविजेत्या राजस्थान रॉयल्सला १२.५ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. आरसीबीला (RCB) दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला होता. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आरसीबीला ७ कोटी रुपये मिळाले. तर चौथ्या क्रमांकाचा संघ लखनौ सुपर जायंट्सलाही ६.५ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.

काल झालेला फायनल सामना चांगलाच रंगतदार झाला आहे. यात डेव्हिड मिलर, ट्रेंट बोल्ट, हार्दिक पांड्या, यशस्वी जैस्वाल, हार्दिक पंड्या(Hardik Pandya), लॉकी फॉर्युसन, जोस बटलर, या खेळाडूंनी सामन्यात सामन्यात रंगत आणली. या खेळाडूंवर बक्षिकांचा पाऊस पडला आहे.

कोणाला किती बक्षीस मिळाले

पंच स्ट्रायकर ऑफ द मॅच - डेव्हिड मिलर- १ लाख रुपये

पॉवरप्लेअर ऑफ द मॅच - ट्रेंट बोल्ट- १ लाख रुपये

मोस्ट वेल्युएबल ऐसेट ऑफ द मॅच - हार्दिक पंड्या- १ लाख रुपये

लेट्स क्रॅक इट सिक्स अवॉर्ड - यशस्वी जैस्वाल- १ लाख रुपये

गेमचेंजर ऑफ द मॅच- हार्दिक पंड्या- १ लाख रुपये

फास्टेस्ट डिलीवरी ऑफ द मॅच- लॉकी फॉर्युसन - १ लाख रुपये

रुपे ऑन गो द मॅच- जोस बटलर- १ लाख रुपये

सामनावीर - हार्दिक पंड्या- ५ लाख रुपये

या सामन्यात सर्वात जास्त बक्षिसांची खैरात हार्दिक पांड्यावर झाली आहे. तीन बक्षिसांवर हार्दिकने आपले नाव कोरले आहे.

कोणत्या संघाने कोणता पुरस्कार जिंकला

विजेता गुजरात टायटन्स २० कोटी रुपये

उपविजेता राजस्थान रॉयल्स १२.५ कोटी रुपये

पर्पल कॅप- युजवेंद्र चहल १० लाख रुपये

ऑरेंज कॅप- जोस बटलर १० लाख रुपये

इमर्जिंग प्लेयर- उमरान मलिक १० लाख रुपये

सीझनचा सुपर स्ट्रायकर - दिनेश कार्तिक टाटा पंच कार

गेम चेंजर ऑफ द सीजन- जोस बटलर १० लाख रुपये

सर्वाधिक सिक्स- जोस बटलर १० लाख रुपये

पॉवर प्लेयर ऑफ द सीझन- जोस बटलर १० लाख रुपये

सीझन फेअर प्ले राजस्थान, गुजरात १० लाख रुपये

फास्टेस्ट डिलीवरी ऑफ द सीझन- लॉकी फॉर्युसन - १० लाख रुपये

कॅच ऑफ द सीझन- इविन लुइस १० लाख रुपये

मोस्ट वेल्यूवल प्लेयर- जोस बटलर १० लाख रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com