IPL 2022: BCCI ची युएई नाही तर 'या' दोन देशांना स्पर्धा घेण्यास पसंती

भारतामध्ये एप्रिलपर्यंत कोरोनाचे (Corona) रुग्ण थांबले नाही तर बीसीसीआय पुन्हा परदेशात आयपीएलचे आयोजन करू शकते.
IPL 2022
IPL 2022Twitter/ @IPL

IPL चा नवा हंगाम लवकरच सुरु होणार आहे. BCCI ने तशी तयारीही सुरु केली आहे. परंतु सध्या जगावर कोरोनाचं सावट पुन्हा वाढत आहे, त्याचबरोबर ओमिक्रॉनचीही भिती वाढत आहे. गेल्या मोसमामध्ये आयपीएलला मध्येच ब्रेक लागला होता. त्यानंतर भारतात कोरोनाचा संसर्ग वाढायला लागल्यामुळे मागचा उर्वरीत हंगाम युएईमध्ये घेण्यात आला होता. माध्यमांच्या वृत्तानुसार आयपीएल 2022 च्या 15 व्या हंगामासाठी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आधीच प्लॅन बी वरती काम करत आहे.

भारतामध्ये एप्रिलपर्यंत कोरोनाचे (Corona) रुग्ण थांबले नाही तर बीसीसीआय पुन्हा परदेशात आयपीएलचे आयोजन करू शकते. पण तो परदेशी देश UAE नसेल. यावेळी बीसीसीआयच्या प्लॅन बीमध्ये ज्या दोन देशांची नावे पुढे येत आहेत, त्यापैकी एक दक्षिण आफ्रिका आणि दुसरा श्रीलंका आहे. 2009 मध्ये दक्षिण आप्रिकेत आयपीएल आयोजीत करण्यात आली होती. त्यामुळे आफ्रिकेला स्पर्धा आयोजनाचा फार काही अनुभव नाहिये.

IPL 2022
India Open 2022: किदांबी श्रीकांतसह ७ भारतीय खेळाडूंवर संक्रात; काेविड १९ ची लागण

UAE नाहीतर या दोन देशांना BCCI ची पसंती

भारतात कोरोनाने बिघडलेल्या परिस्थीतीमुळे गेल्या 2 वर्षांपासून बीसीसीआयच्या मोठ्या क्रिकेट स्पर्धांसाठी UAE ला पहिली पसंती देत आहे. आयपीएल 2021 चा दुसरा हाफ देखील युएईमध्ये खेळला गेला आहे. त्यानंतर 2021 चा टी-20 विश्वचषकही तिथे आयोजित करण्यात आला होता. पण, आता BCCI ने UAE व्यतिरिक्त इतर ठिकाणांच्या काही पर्यायांवर विचार सुरू केला आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही एकट्या यूएईवर नेहमीच अवलंबून राहू शकत नाही. इतर पर्याय शोधावे लागतील. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्या वेळेतील फरक खेळाडू आणि क्रिकेट चाहत्यांनाही खूप अनुकूल आहे.

दक्षिण आफ्रिका पर्याय योग्य

भारत दक्षिण आफ्रिकेच्या वेळेपेक्षा 3 तास 30 मिनिटे पुढे आहे. म्हणजे पहिला चेंडू दक्षिण आफ्रिकेत संध्याकाळी 4 वाजता पडला जाईल, जेव्हा भारतात संध्याकाळी 7:30 वाजले असतील. त्यामुळे प्रक्षेपणाच्या वेळेवर परिणाम होणार नाही आणि तिथे सामनाही योग्य वेळेत संपेल, त्यामुळे खेळाडूंनाही विश्रांती मिळेल.

आयपीएल 2022 साठी बीसीसीआयच्या प्लॅन बी मध्ये दक्षिण आफ्रिकेचे नाव देखील आघाडीवर आहे. कारण अलीकडील मालिका तिथे यशस्वीरित्या संपली आहे. भारत अ संघाचा दौरा असो की वरिष्ठ संघादरम्यान खेळली जाणारी कसोटी मालिका. या दोन मालिकांच्या यशाने बीसीसीआयला यूएईऐवजी दक्षिण आफ्रिकेचा विचार करण्यास भाग पाडले आहे.

जेव्हा टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरू होणार होता, तेव्हा तिथल्या ओमिक्रॉनच्या वाढत्या लाटेमुळे या मालिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. पण मालिका सुरू झाल्यावर ओमिक्रॉनचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. दक्षिण आफ्रिकेने भारताचे यशस्वी यजमानपद भूषवले आहे. आता चांगली बातमी अशी आहे की ओमिक्रॉनची प्रकरणे दररोज कमी होत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com