'तुम्ही मला यलो जर्सीत...' आयपीएल निवृत्तीबाबत महेंद्रसिंग धोनीचं मोठं विधान

IPL 2022 : 40 वर्षीय महेंद्रसिंग धोनीने याआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे
'तुम्ही मला यलो जर्सीत...' आयपीएल निवृत्तीबाबत महेंद्रसिंग धोनीचं मोठं विधान
MS Dhoni Saam Tv

नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएल (IPL 2022) हंगामातील निराशाजनक कामगिरीनंतर रविंद्र जडेजाने (Ravnndra Jadeja) अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं (CSK Team) कर्णधारपद पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीकडे (MS Dhoni) आलं. धोनी पुन्हा कर्णधार बनल्यानंतर सगळ्यानाच आनंद झाला. चेन्नईच्या चाहत्यांनी देखील मैदानात मोठा जल्लोष केला. अशातच धोनी फक्त याच हंगामात कर्णधारपद सांभाळणार की, पुढच्या वर्षीही तोच असणार? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर धोनीला हा प्रश्न विचारण्यात आला यावर धोनीने हसून उत्तर दिलं.

MS Dhoni
धोनी, विराट आणि रोहित शर्माला एकाच दिवशी मिळालं मोठं गिफ्ट!

नाणेफेकीच्या वेळी समालोचक डॅनी मॉरिसनने धोनीला विचारले की, मी तुला दोन वर्षांपूर्वी विचारले होते की पुढच्या वर्षीही आम्ही तुला पिवळ्या जर्सीत पाहू का? यावर धोनीने हसून उत्तर दिले. तो म्हणाला की, मागच्या वेळीही मी पिवळ्या जर्सीत दिसणार असल्याचे सांगितले होते. पण ती पिवळी जर्सी असेल की दुसरी, याबाबत मी आता काही सांगू शकत नाही. महेंद्रसिंग धोनीच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

40 वर्षीय महेंद्रसिंग धोनीने याआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या तो फक्त आयपीएल खेळत आहे. यावर्षी झालेल्या मेगा लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने रवींद्र जडेजाला पहिला खेळाडू म्हणून कायम ठेवलं होतं. त्यानंतर आयपीएल सुरू होताच त्याला संघाचा कर्णधार बनवलं, तेव्हा धोनीचा हा शेवटचा हंगाम असू शकतो, अशी चर्चा सुरू होती. मात्र, जडेजाच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2022 मध्ये चेन्नईला गतविजेत्या चांगली कामगिरी करता आळी नाही. जडेजाच्या नेतृत्वात पहिल्या 8 पैकी 6 सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत धोनीकडे पुन्हा संघाची कमान सोपवण्यात आली.

MS Dhoni
“आम्ही असेच खेळतो”; पहिल्या विजयानंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया

धोनी CSKचा कर्णधार म्हणून कायम राहणार का?

दरम्यान, धोनीला फक्त यावर्षीच्या आयपीएलसाठी पुन्हा कर्णधार बनवण्यात आलंय की, पुढच्या वर्षीही माही त्याच भूमिकेत दिसणार? ते अजून स्पष्ट झालेले नाही. पण यापुढेही मी पिवळ्या जर्सीतच दिसणार असल्याचे संकेत त्याने दिले आहेत. यावरून तो चेन्नई सुपर किंग्जशी जोडला जाईल, अशी अपेक्षा आहे. पण त्यांची भूमिका बदलू शकते आणि ती काय असेल? यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.