KKR vs SRH: करो या मरो ची लढत; सामन्यापुर्वी कोलकाताला मोठा धक्का!

आतापर्यंत 12 सामने खेळलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने 7 सामने गमावले आहेत, तर 5 सामने जिंकले आहेत.
KKR vs SRH: करो या मरो ची लढत; सामन्यापुर्वी कोलकाताला मोठा धक्का!
SRH vs KKRSaam T

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2022) प्रत्येक सामना प्लेऑफसाठी रोमांचक झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH vs KKR) यांच्यात एक महत्त्वाचा सामनाही होणार आहे, जो करो किंवा मरो असा असणार आहे. प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ते किती महत्त्वाचे आहे. कोलकाता नाईट रायडर्सला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहायचे असल्यास हा सामना कसल्याही परिस्थीत जिंकावा लागणार आहे.

आतापर्यंत 12 सामने खेळलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने 7 सामने गमावले आहेत, तर 5 सामने जिंकले आहेत. संघाचे 10 गुण आहेत आणि कोलकाताच्या संघाला अजून 2 सामने खेळायचे आहेत. केकेआरने आता दोन सामने जिंकले तरी त्यांच्या खात्यात 14 गुण जमा होतील, म्हणजेच प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शाश्वती नाही पण आशा कायम आहेत. केकेआरसाठी एक वाईट बातमी आहे की स्टार अष्टपैलू पॅट कमिन्स उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे.

SRH vs KKR
चेन्नईच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' खेळाडूच्या निवृत्तीबाबत 'CSK' चं स्पष्टीकरण

सनरायझर्स हैदराबाद

सुरुवातीच्या दमदार कामगिरीनंतर सलग सामने गमावल्याने सनरायझर्स हैदराबाद संघ अडचणीत आला आहे. मात्र, हैदराबाद अजूनही प्लेऑफमध्ये जाऊ शकतो. हैदराबादने आतापर्यंत 11 सामने खेळले असून त्यापैकी 5 जिंकले असून त्यांचे 10 गुण आहेत. म्हणजेच पुढचे ३ सामने संघाने जिंकले, तर ते सहज प्लेऑफमध्ये पोहचू शकतात. हैदराबादसाठीही कठीण काळ आहे, इतर संघांच्या कामगिरीवर हैदराबादचे भवितव्य अवलंबून असणार आहे. संघाचे पहिले लक्ष्य 16 गुण मिळविण्याचे आहे, जरी संघ KKR विरुद्ध हरला तरी तो प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणार नाही.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक आहे. फिरकी गोलंदाजांसाठी खेळपट्टी चांगली आहे, मात्र आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये फिरकीपेक्षा वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळाली आहे. इथे पहिल्या डावात 180 धावा ही चांगली धावसंख्या आहे. दुसऱ्या डावात संघाने 180 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य ठेवले तर दडपण तर असेलच, शिवाय ते अवघडही असेल.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.