IPL 2022 : सहा पराभवानंतरही चेन्नई प्ले-ऑफमध्ये पोहचणार? पाहा समीकरण

IPL 2022 : चेन्नईचा संघ आयपीएल 2022 मध्ये प्ले-ऑफमध्ये पोहचणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
CSK Playoffs
CSK PlayoffsSaam Tv

IPL 2022 : आयपीएलमध्ये चारवेळा विजेतेपदाची माळ गळ्यात घालणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाची यंदाच्या आयपीएल (IPL 2022) हंगामात खराब सुरूवात झाली. हंगामाच्या सुरूवातीला रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) सीएसके संघाचं नेतृत्व केलं, पण संघाच्या खराब कामगिरीनंतर जडेजाने पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे (MS Dhoni) सोपवली. यंदाच्या हंगामात प्रथमच कर्णधारपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर धोनीने हैदराबादविरुद्धच्या (SRH vs CSK) सामन्यात चेन्नईला विजय मिळवून दिला. अशातच चेन्नईचा संघ आयपीएल 2022 मध्ये प्ले-ऑफमध्ये पोहचणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

CSK Playoffs
....म्हणून चेन्नई सुपर किंग्जच्या 'त्या' खेळाडूवर कॅप्टन कुल धोनी भडकला

पहिल्या 9 सामन्यांमध्ये सीएसकेला फक्त 3 सामन्यांत विजय मिळवता आला. तर 6 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. अजूनही चेन्नई संघाला 5 सामने खेळायचे आहे. अशा स्थितीतही चेन्नईचा संघ प्ले-ऑफची (Playoffs 2022) फेरी गाठू शकतो. त्यासाठी चेन्नईच्या संघासमोर 3 समीकरण आहे. अशा परिस्थिती धोनाच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ पुन्हा एकदा प्ले-ऑफची फेरी गाठणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पहिले समीकरण

आयपीएलमध्ये प्रत्येक संघाला 14 सामने खेळावे लागतात. चेन्नई संघाने आतापर्यंत 9 सामने खेळले असून यामध्ये त्यांना 3 सामन्यांत विजय मिळवता आला आहे. सध्या गुणतालिकेत चेन्नईचा संघ 6 गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. अजूनही चेन्नईला 5 सामने खेळायचे आहेत. अशातच उर्वरित सर्व सामन्यांत त्यांनी विजय मिळवला तर, त्यांचे गुण 16 होतील. त्यामुळे चेन्नईच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम राहिल.

CSK Playoffs
फळ विक्रेत्याचा मुलगा असा झाला ‘वेगवान गोलंदाज’, जाणून घ्या उमरान मलिकची कहाणी

दुसरे समीकरण

चेन्नईला उर्वरित 5 सामन्यांत फक्त विजय मिळवून प्ले-ऑफमध्ये पोहचता येणार नाही. कारण त्यांचे नेट रनरेट खूपच कमी आहे. त्यामुळे 5 पैकी 2 सामने त्यांना मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. म्हणजेच चेन्नईला प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारावी लागेल आणि सामना किमान 50 धावांच्या अंतराने जिंकावा लागेल. सीएसकेला रनरेटकडेही लक्ष द्यावे लागेल. इतर संघांना 2 ते 3 षटके कमी धावसंख्येवर बाद करून सामना जिंकावा लागेल.

तिसरे समीकरण

चेन्नईला प्ले-ऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर इतर संघांचे समीकरणही सांभाळावे लागणार आहे. सध्या गुजरात आणि लखनौ प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत चेन्नईला गुणतालिकेत सध्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाच्या खराब कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल. सध्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाने खराब कामगिरी केली तर, सीएसकेचा प्ले-ऑफमध्ये पोहचण्याचा आशा पल्लवीत होतील.पण तसं होणं जवळपास अवघड आहे.

सध्या गुणतालिकेत गुजरात आणि लखनौचा संघ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, हैदराबाद, राजस्थान, बेंगळुरू आणि दिल्लीचे संघ प्ले-ऑफमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर पोहोचण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. अशा परिस्थितीत आयपीएलचे उर्वरित सर्व सामने प्लेऑफच्या दृष्टीने अतिशय रोमांचक आणि मनोरंजक होणार आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com