आधी हेल्मेट, मग बॅट...बाद दिल्यानंतर मॅथ्यू वेडनं ड्रेसिंग रूममध्ये सर्व राग काढला

चेंडू बॅटची कड घेऊन गेला असतानाही अल्ट्रा एजमध्ये बॅटचा संपर्क झाला नसल्याचे दिसून आले.
Matthew Wade
Matthew Wadesaam tv

मुंबई: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला बाद ठरवल्यामुळं डीआरएस प्रणालीवर शंका उपस्थित होत असतानाच, पुन्हा असाच काहीसा प्रकार गुजरात टायटन्सचा फलंदाज मॅथ्यू वेडच्या (Matthew Wade) बाबतीत घडला आहे. मुंबईत बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात मॅथ्यू वेडला पायचीत घोषित करण्यात आले. मात्र, बॅटला कड लागून गेल्याचे वेड याला वाटत होते. चेंडू बॅटची कड घेऊन गेला असतानाही अल्ट्रा एजमध्ये बॅटचा संपर्क झाला नसल्याचे दिसून आले आणि वेडला बाद घोषित करण्यात आले. या निर्णयामुळं वेडनं तीव्र नाराजी व्यक्त केली. ड्रेसिंग रुममध्ये (Cricket dressing room) गेल्यानंतरही त्याला राग आवरता आला नाही. त्यानं हेल्मेट फेकून दिला. त्यानंतर हातातील बॅटही आपटली. हा सगळा त्याचा त्रागा कॅमेऱ्यात टिपला गेला.

Matthew Wade
अमिताभ बच्चन, शाहरूख, अजय देवगण, रणवीर सिंहविरोधात कोर्टात खटला

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरातचा सामना आज बाद फेरी गाठण्यासाठी उत्सूक असलेल्या बेंगळुरू संघाशी होत आहे. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल हे दोघे सलामीला आले. दोन षटकांत साहाने चांगली फटकेबाजी केली. तर गिल हा सुरुवातीपासूनच चाचपडत खेळत होता. अखेर हेजलवुडच्या तिसऱ्या षटकात मॅक्सवेलनं गिलचा सुंदर झेल टिपला.

संघाच्या २१ धावा असतानाच, गुजरातला मोठा धक्का बसला. गिलनं फक्त एक धाव केली. त्यानंतर मैदानात आलेल्या मॅथ्यू वेडनं चांगली सुरूवात केली. वेड आत्मविश्वासानं फटकेबाजी करत होता. चांगली धावसंख्या उभारेल असे वाटत असतानाच, मॅक्सवेलच्या षटकात त्याला पायचीत घोषित करण्यात आले. मात्र, बॅटची कड घेऊन चेंडू पायावर आदळला असं वेडला वाटलं. त्याने डीआरएस घेतला. पण अल्ट्रा एड्जमध्ये बॅटला चेंडूची कड लागली नसल्याचे दिसले आणि तिसऱ्या पंचांनीही वेडला बाद दिले.

पण रिप्लेमध्ये वेडच्या बॅटची कड लागल्याचे काहीसे दिसत होते. या निर्णयाने मॅथ्यू वेडनं तीव्र नाराजी व्यक्त केली. मैदानातही तो पुटपुटत जात होता. ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर त्याचा पारा आणखीनच चढला. रागाच्या भरात त्याने हातातील हेल्मेट फेकून दिले. त्यानंतर बॅट आपटून आपला राग व्यक्त केला. ड्रेसिंग रुममधला हा प्रकार कॅमेऱ्यात टिपला गेला. अनेकांना मॅथ्यू वेड बाद नसल्याचेच वाटत होते. नेटकऱ्यांनीही वेड बाद नव्हता अशा प्रतिक्रिया दिल्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com