IPL 2022: दिल्लीच्या संघात दिग्गज खेळाडूंचे रिटेंशन नाही; आश्विनची माहिती

रविचंद्रन अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की दिल्ली कॅपिटल्स संघ त्याला कायम ठेवणार नाही.
IPL 2022: दिल्लीच्या संघात दिग्गज खेळाडूंचे रिटेंशन नाही; आश्विनची माहिती
IPL 2022: दिल्लीच्या संघात दिग्गज खेळाडूंचे रिटेंशन नाही; आश्विनची माहिती Twitter

IPL 2022 ची तयारी सुरु झाली आहे. खेळाडूंचे लिलाव त्याचबरोबर कोणते खेळाडू संघात कायम ठेवायचे याबाबत संघ व्यवस्थापक विचार करत आहेत. दिल्लीच्य संघातून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. IPL 2022 च्या दिल्ली संघात कोणते खेळाडू कायम (Retention) ठेवयचे यावर बोलताना रविचंद्रन अश्विनने मोठा खुलासा केला आहे. आर अश्विनने (R. Ashwin) सांगितले आहे की दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझी त्याला आगामी हंगामासाठी कायम ठेवणार नाही. एवढेच नाही तर दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यरबद्दलही (Shreyash Iyer) संघ कायम ठेवणार नाही म्हणजे आश्विन आणि श्रेयश अय्यर यांचा हे खेळाडूंसाठी लिलावाच्या मैदानात असणार आहेत.

IPL 2022: दिल्लीच्या संघात दिग्गज खेळाडूंचे रिटेंशन नाही; आश्विनची माहिती
IPL 2022: पंजाब 'या' तीन खेळाडूंना रिटेन करण्याच्या तयारीत

रविचंद्रन अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की दिल्ली कॅपिटल्स संघ त्याला कायम ठेवणार नाही. तो म्हणाला की दिल्ली कॅपिटल्सने त्याला कायम ठेवले असते संघ व्यवस्थापनाने त्याला आतापर्यंत कळवले असते. अश्विनने हे केवळ स्वतःसाठीच नाही तर संघाचा माजी कर्णधार श्रेयस अय्यरबद्दलही सांगितले. तो म्हणाला मला वाटत नाही की दिल्लीचा संघ पुढील हंगामात श्रेयस अय्यरलाही कायम ठेवेल. श्रेयस अय्यरने आयपीएल 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते, या हंगामात संघ प्रथमच आयपीएलची फायनल खेळला होता.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com