IPL 2023: आयपीएलच्या यंदाच्या हंगामात BCCI चं कठोर पाऊल! फ्रेंचायझींची डोकेदुखी वाढणार?

IPL season 2023 : स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयने फ्रँचायझींसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. या गाडइलाइन्स सर्व संघांच्या खेळाडूंना पाळाव्या लागणार आहेत.
IPL season 2023
IPL season 2023SAAM TV

BCCI IPL Guidelines: यंदाचे आयपीएल सुरु होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. येत्या ३१ मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दरम्यान स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयने एक मोठा बदल जाहीर केला आहे. BCCI ने फ्रँचायझींसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. या गाडइलाइन्स (BCCI Medical Guidelines) सर्व संघांच्या खेळाडूंना पाळाव्या लागणार आहेत. आयपीएलच्या यंदाच्या हंगमाची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याने होणार आहे.

आयपीएल सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने स्पर्धेच्या सुरक्षेच्या कारणास्तव काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. कोरोना विषाणूचा पुन्हा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन बीसीसीआयने हे मोठे पाऊल उचलले आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, या आठवड्यात आयपीएलच्या सर्व फ्रँचायझींना कोविड मार्गदर्शक तत्त्वे सांगितली जातील.

IPL season 2023
Rahul Gandhi यांच्या निवासस्थानी पोहोचले पोलीस, काश्मीरमध्ये महिलांबाबत केलेल्या वक्तव्याची चौकशी करणार

किमान 1 आठवड्यासाठी आयसोलेशन

यावेळी कोरोनाचे नियम पूर्वीसारखे कठोर नसले तरी देखील एखादा खेळाडू किंवा संघातील सदस्याला कोविडची लागण झाली तर त्याला किमान 1 आठवड्यासाठी आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. या काळात पॉझिटिव्ह असलेला खेळाडू संघाच्या कोणत्याही सामन्यात किंवा सराव सत्रात भाग घेणार नाही, असे या गाइडलाइन्समध्ये म्हटले आहे. (Sports News)

काय आहेत नव्या गाइडलाइन्स?

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार कोविड पॉझिटिव्ह असलेल्या खेळाडूला आठवडाभर आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल. यानंतर पाचव्या दिवशी त्या खेळाडूची आरटी पीसीआर चाचणी होईल. ही चाचणी निगेटिव्ह आल्यास २४ तासांच्या आत पुन्हा चाचणी केली जाईल. दोन्ही चाचण्यांमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरच खेळाडू संघातील सदस्यांमध्ये सामील होऊ शकेल.

IPL season 2023
Chhatrapati Sambhajinagar मध्ये नामांतराच्या समर्थनार्थ हिंदू संघटनांचा मोर्चा! हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित

होम ग्राउंडवर होणार सामने

गेल्या तीन वर्षांपासून कोरोना विषाणूमुळे बीसीसीआयने कठोर नियमावली पाळली. परंतु यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने संघांना त्यांच्या घरच्या क्रिकेट मैदानावरही सामने खेळता येणार आहे. बीसीसीआयने यंदा वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांमध्येही बरीच शिथिलता दिली आहे. परंतु आपल्याला अजूनही याबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असे बीसीसीआयचे असे मत आहे. (Latest Marthi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com