Ruturaj Gaikwad News: ऋतुराज बरसला! गुजरातला बेक्कार झोडपले, पण या मोसमातील मोठी संधी गमावली

Ruturaj Gaikwad News: ऋतुराजने 184 च्या सरासरीने अवघ्या 50 चेंडूत 92 धावांची खेळी केली.
Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwad Twitter IPL

IPL 2023, CSK vs GT : इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची जोरदार फडकेबाजी दिसली. ऋतुराजचं शतक मात्र अवघ्या 8 धावांनी हुकलं. ऋतुराजने 92 धावांची तुफानी खेळी केली. मात्र जोसेफच्या चेंडूवर तो झेलबाद झाला.

ऋतुराजने 184 च्या सरासरीने अवघ्या 50 चेंडूत 92 धावांची खेळी केली. या खेळीत ऋतुराजने 9 षटकार आणि 4 चौकार ठोकले. अल्झारी जोसेफच्या फुल टॉस बॉलवर शुभमन गिलने त्याचा झेल टिपला.

जोसेफने फेकलेला बॉल ऋतुराजच्या कमरेजवळ होता. त्यामुळे अम्पायरला आधी नो बॉल आहे का असा संशय होता. त्यावेळी अम्पायरनी रिव्ह्यूमध्ये नो बॉल तपासला. मात्र तो नो बॉल नसल्याने ऋतुराजला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. (Latest sports updates)

Ruturaj Gaikwad
Impact Player Rule: 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणजे नेमके काय? कधी करता येणार वापर? समजून घ्या सोप्या शब्दात..

गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. गुजरातने दोन्ही सामने जिंकले आहेत. मात्र आजचा सामना जिंकून चेन्नई आणि गुजरात दोन्ही संघ सीजनची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करतील.

Ruturaj Gaikwad
GT vs CSK IPL Match: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची झुंजार खेळी, शतक हुकलं; चेन्नईचे गुजरातला १७९ धावांचे आव्हान

चेन्नईचे गुजरातला १७९ धावांचे आव्हान

चेन्नईने पहिला गडी गमावल्यानंतर मोईन अलीने दुसऱ्या विकेटसाठी ३६ धावा कुटल्या. त्यानंतर राशिद खानने आठव्या षटकात बेन स्टॉक्सला बाद केले. स्टॉक्स बाद झाल्यानंतर गायकवाडने अंबाती रायडूसोबत ५१ धावांची भागीदारी रचली. मात्र, त्यानंतर १३ व्या षटकात रायडू बाद झाला.

पुढे अठराव्या षटकात ९२ धावांवर ऋतुराज बाद झाला. तर अल्जारीने रविंद्र जडेजाला १ धावावर बाद केले. तर धोनीने ७ चेंडूत १ षटकार आणि १ चौकारच्या मदतीने १४ धावा कुटल्या. तर मिशेल १ धावा करून बाद झाला. अखेर चेन्नई २० षटकाअखेर गुजरातला १७९ धावांचे आव्हान दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com