
MS Dhoni Retirement News: ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवेची धुव्वाधार फलंदाजी त्यांना इतर फलंदाजांनी दिलेली चांगली साथ आणि शेवटच्या षटकात रविंद्र जडेजाने केलेल्या फटकेबाजीमुळे महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलच्या फायनल सामन्यात गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले. (Latest sports updates)
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईला डकवर्थ लुईस नियमानुसार विजयासाठी १५ षटकात १७१ धावांचं आव्हान मिळालं होतं. चेन्नईने हे आव्हान शेवटच्या बॉलवर चौकार ठोकून पूर्ण केलं. सर रविंद्र जडेजा चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. (Indian Premier League 2023)
शेवटच्या दोन चेंडूत चेन्नईला विजयासाठी १० धावांची गरज असताना जड्डूने षटकार आणि चौकार ठोकत सनसनाटी विजय मिळवून दिला. चेन्नईने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात पाचव्यांदा आयपीएल टॉर्फी जिंकण्याची कामगिरी केली. धोनीने या मोठ्या विजयानंतर पोस्ट मॅच प्रोडक्शनमध्ये हर्षा भोगलेला आपल्या निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली.
“माझी निवृत्ती जाहीर करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. मला जेवढे प्रेम मिळाले आहे, इथून निघून जाणं ही सोपी गोष्ट आहे, पण त्याहून (Cricket News) कठीण गोष्ट म्हणजे 9 महिने मेहनत करून पुन्हा आयपीएल खेळण्याचा प्रयत्न करणं. हे माझ्याकडून एक भेट असेल, शरीरासाठी ते सोपं होणार नाही” अशी धोनीने प्रतिक्रिया दिली.
आयपीएलच्या फायनल सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात २१४ धावा केल्या होत्या. त्यामुळे चेन्नईला विजयासाठी आधी २१५ धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र चेन्नईच्या बॅटिंगला (Sport News) सुरुवात झाल्याच्या ३ बॉलनंतर पावसाची एन्ट्री झाली. पावसामुळे काही तास वाया गेले. त्यामुळे चेन्नईला डकवर्थ लुईस नियमानुसार १५ ओव्हर्समध्ये विजयासाठी १७१ धावांच सुधारित आव्हान मिळालं. हे आव्हान चेन्नईने ५ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.