
Mumbai Indians vs Gujarat Titans Matches: आयपीएल 2023 मध्ये आज दुसरा क्वॉलिफायर सामना हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघात होणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई संघासोबत फायनल सामना खेळेल. त्यामुळे आजच्या सामन्यात नेमका कोणता संघ बाजी मारणार? याकडे क्रिडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. अशातच मुंबईच्या चाहत्यांना धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. (Latest sports updates)
यपीएल टी-२० स्पर्धेच्या दुसऱ्या ‘क्वालिफायर’मध्ये मुंबईपुढे गतविजेत्या गुजरात टायटन्सचे तगडे आव्हान असेल. जगातील सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियम, नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही लढत होईल. हा सामना गुजरातच्या घरच्या मैदानावर होणार असल्याने गुजरातला पराभूत करण्याचं तगडं आव्हान मुंबईसमोर असणार आहे. गुजरातचा संघ मजबूत असला तरी, मुंबईच्या संघाला देखील कमी लेखून चालणार नाही.
गेल्या वर्षी गुणतालिकेत तळ गाठणाऱ्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) यंदा चांगला खेळ दाखवला. सुरूवातीचे सामने गमावल्यानंतर मुंबईने ‘एलिमिनेट’चा अडथळा पार करून दुसऱ्या ‘क्वालिफायर’पर्यंत मजल मारली. आता त्यांना सहाव्या जेतेपदाचे स्वप्न पडू लागले आहे.
गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गुजरात टायटन्सने कमालीची कामगिरी केली. याचं श्रेय त्यांच्या गोलंदाजांना जातं. गुजरातचा अनुभवी गोलंदाज शमीने १५ सामन्यांतच २६ विकेट खिशात टाकल्या आहेत. त्याला राशिद खान, नूर अहमद आणि मोहित शर्माची चांगलीच साथ लाभलेली आहे. दुसरीकडे शुभमन गिल, डेव्हिड मिलर, वृद्धिमान साहा आणि हार्दिक पांड्याने फलंदाजीत चांगले सातत्य दाखवले आहे. (Indian Premier League 2023)
मुंबईविरुद्धची आजची लढत गुजरातचे घरचे मैदान म्हणजेच नरेंद्र मोदी स्टेडियमवर आहे. इथल्या खेळपट्या, आऊटफील्ड याबाबत हार्दिक आणि कंपनीला अधिक ज्ञान आहे. शुभमन गिल, विजय शंकर यांच्यामुळे गुजरातची सुरुवात छान होते. चेन्नईविरुद्ध गिल अपयशी ठरला होता; पण तो अपवाद म्हणावा लागेल, अर्थात तो बाद झाला तर पर्यायी डावपेच गुजरातकडे असायलाच हवेत.
गिलने १५ सामन्यांत ५५.५३च्या सरासरीने ७२२ धावा तडकावल्या असून, यात दोन शतके आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. गुजरातकडून दुसऱ्या (Cricket News) क्रमांकाच्या सर्वाधिक धावा (३०१) विजय शंकरने केल्या आहेत. मात्र अव्वल गिल आणि शंकर यांच्यात ४२१ धावांचा फरक आहे, यावरूनच गिलचा झंझावात दिसून येतो.
दुसरीकडे मुंबईच्या संघाला देखील कमी लेखून चालणार नाही. मुंबईकडून कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि टीम डेव्हिड यांनी मोठमोठ्या आव्हानांचा यशस्वी सामना केला. या फळीत पुढे नेहल वढेराही आला. त्यानेही प्रभावी कामगिरी केली. रोहित शर्मा, ईशान किशन ही सलामीची जोडी छाप पाडत आहे, मात्र हे सगळे फलंदाज गुजरातचा गोलंदाजीतील आधारस्तंभ मोहम्मद शमीला कसे ‘तोंड’ देतात ते सामन्याच्या निकालावर परिणाम करू शकते.
मुंबईचा वेगवान गोलंदाज आकाश मढवाल सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्याने एलिमिनेटर सामन्यात लखनऊच्या फलंदाजांच्या अक्षरश: चिंधड्या (Sport News) उडवल्या होत्या. मात्र, आकाश मढवालचे कोडकौतुक करताना बुजूर्ग स्पिनर पीयूष चावलाचे १५ सामन्यांतील २१ विकेटच्या योगदानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मुंबईचा पाय खोलात होता तेव्हापासून चावला योगदान देत आहे. जेसन बेहरेनडॉर्फने ११ लढतींत १४ विकेट टिपल्या असून तो पावरप्लेमध्ये कशी गोलंदाजी करतो? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.