
MI vs LSG Match Updates: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा १६ व्या हंगाम निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. कारण, आयपीएलच्या साखळी सामन्यांचा शेवटचा आठवडा सुरू झालाय. आज रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघाचा सामना कृणाल पांड्याच्या लखनौ सुपरजायंट्सोबत होणार आहे. प्ले-ऑफच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान, सामना सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. (Latest sports updates)
लखनौविरुद्धच्या या करो या मरो सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघात आता एक मॅचविनर खेळाडूची एंट्री झाली आहे. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यापूर्वी रोहित शर्माची चिंता मिटलेली आहे. मुंबईने जर आजचा गमावला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे या सामन्यासाठी रोहित शर्मा सर्वात तगडा संघ उतरवणार आहे.
पण त्यापूर्वीच मुंबई इंडियन्सच्या संघासाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. मुंबईच्या संघाला आतापर्यंत एकहाती सामने जिंकून देणाऱ्या तिलक वर्माची संघात एन्ट्री होण्याची शक्यता आहे. गेल्या काही सामन्यांपासून तिलक वर्मा हा दुखापतग्रस्त होता. त्यामुळे त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. पण आता तो फिट झाला आहे.
त्यामुळे लखनौच्या संघाविरुद्ध खेळताना तिलक वर्माला मुंबईच्या संघात स्थान मिळू शकते आणि त्यांची बाजू चांगलीच भक्कम होऊ शकते.मुंबईच्या संघाला आतापर्यंत काही सामने तिलक वर्माने जिंकवून दिले आहेत. पण चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे गेले काही सामने तो खेळू शकला नव्हता. पण आता तो पूर्णपणे फिट झाला आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्स संघाने यंदाच्या हंगामात आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. यातील ७ सामने जिंकून १४ गुणांसह गुणतालिकेत मुंबईचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. तर लखनौच्या संघाने १२ पैकी ६ सामने जिंकून १३ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. आजच्या सामन्यात जो संघ विजय होईल, तो प्ले-ऑफमध्ये पोहचण्याच्या शर्यतीत कायम राहिल. त्याचबरोबर ज्या संघाचा पराभव होईल, तो संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून पूर्णपणे बाद होईल.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.