
MI Vs LSG Eliminator, Rohit Sharma Prediction : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात 'करो या मरो' लढत होणार आहे. त्याआधीच रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सचा संघ आणि टीम इंडिया यांच्यासंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे.
रोहित शर्मा याने मुंबई इंडियन्सच्या दोन युवा खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हे दोन्हीही खेळाडू पुढील दोन वर्षांत टीम इंडियाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरून चांगली कामगिरी करताना पाहायला मिळू शकतात, असे तो म्हणाला. (Latest sports updates)
मुंबईच्या संघाने आयपीएल २०२३ मध्ये प्ले ऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा हा संघ एलिमिनेटर लढतीत बुधवारी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध मैदानात उतरणार आहे. या सामन्याआधीच रोहित शर्मा याने तिलक वर्मा आणि नेहाल वढेरा यांचे विशेष कौतुक केले आहे.
तिलक वर्मा याने मागील मोसमात आयपीएल पदार्पण केले होते. पहिल्याच मोसमात या फलंदाजाने चांगली कामगिरी केले होते. त्याने आपल्या खेळीने सर्वांनाच प्रभावित केले होते. यावर्षीही तिलक वर्मा चांगलाच फॉर्मात आहे. तर नेहाल वढेराने या मोसमात पदार्पण केले आणि मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले. मुंबई इंडियन्ससाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. हे दोघेही मुंबईसाठी मॅच विनर ठरले आहेत.
रोहित शर्मा त्यांच्या कामगिरीने खूपच खूश झाला आहे. ज्या प्रकारे जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि क्रुणाल पंड्या यांनी मुंबई इंडियन्समधून खेळताना नाव कमावलं, तसंच तिलक आणि नेहाल या दोघांचा प्रवासही या तिघांसारखाच असेल. हे दोघे आगामी काळात फक्त मुंबई इंडियन्सच नाही, तर टीम इंडियातही खेळताना दिसतील आणि चांगली कामगिरी करतील. मुंबईचा संघ हा भविष्यातील सुपरस्टार संघ आहे, असे लोक बोलू लागतील, असा विश्वासही रोहितने व्यक्त केला.
तिलक वर्मा याने या मोसमात फक्त ९ सामने खेळले आहेत. आजारी असल्याने तो काही सामने खेळू शकला नाही. त्याने ४५ पेक्षा अधिकच्या सरासरीने २७४ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेटही १६० च्या आसपास आहे. तर नेहालने १२ सामन्यांत दोन अर्धशतके झळकावली आहेत.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. मुंबईचा संघ बुधवारी लखनऊविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळणार आहे. तिलक वर्मा आणि नेहाल वढेरा यांनी या सामन्यात दमदार कामगिरी करावी, अशी रोहितला अपेक्षा आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.