
MI vs LSG Match Updates: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ६३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन संघात सुरू झाला आहे. प्ले-ऑफच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी अत्यंत महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लखनौ संघाला सुरूवातीला फलंदाजी करावी लागणार आहे. दरम्यान, लखनौचा मेंटॉर गौतम गंभीर याने मुंबईला पराभूत करण्यासाठी एक मोठा प्लॅन आखलाय. (Latest sports updates)
लखनौच्या घरच्या मैदानावर मुंबईला पराभूत करण्यासाठी गौतम गंभीरने आपल्या प्लेईंग-११ मध्ये मोठे बदल केले आहेत. गंभीरने वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकला संघात स्थान दिलं आहे. नवीन गेल्या सामन्यात खेळला नव्हता.
मात्र, मुंबईविरोधातील सामन्यात त्याला स्थान देण्यात आलं आहे. त्याचबरोबर गौतमी गंभीरने विस्फोटक फलंदाज दीपक हुड्डाला देखील संघात स्थान दिलं आहे. काईल मेयर्सच्या जागेवर गंभीरने दीपक हुड्डाचा संघात समावेश केला आहे.
लखनऊ आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. मुंबई आणि लखनऊचे संघ गुणतालिकेत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी ‘करो किंवा मरो’ असा आहे.
पराभूत संघासाठी पुढील वाटचाल खडतर असेल. यासोबतच विजेत्या संघाचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग मोकळा होईल. दोन्ही संघ हा सामना व्हर्च्युअल नॉकआऊटप्रमाणे खेळणार आहेत.
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल.
लखनऊ सुपर जायंट्स: क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), दीपक हुडा, प्रेरक मांकड, कृणाल पांड्या (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंग, मोहसिन खान.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.