Suryakumar Yadav In IPL 2023 : सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग ११ मधून बाहेर? प्रशिक्षकाच्या उत्तरानं अनेकांच्या भुवया उंचावल्या

IPL 2023 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत तिन्ही सामन्यांत शून्यावर बाद होणारा सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग ११ मध्ये असेल की नाही, यावर संघाच्या प्रशिक्षकांनीच थेट उत्तर दिलं आहे.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavSocial Media

IPL 2023, Mumbai Indians : भारतीय क्रिकेट संघातील बरचसे खेळाडू आता ३१ मार्चपासून पुन्हा मैदानात उतरतील. इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) 16 व्या पर्वाला सुरुवात होत आहे. क्रिकेटचा महामेळाच देशभरात भरणार आहे.

या मोसमातील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. त्याचवेळी आयपीएल आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत तिन्ही सामन्यांत शून्यावर बाद होणारा सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग ११ मध्ये असेल की नाही, यावर संघाच्या प्रशिक्षकांनीच थेट उत्तर दिलं आहे. (Latest sports updates)

Suryakumar Yadav
Playing 11 Of All IPL Teams: आयपीएल स्पर्धेत कोण कोणावर पडणार भारी? पाहा सर्व संघांची बेस्ट प्लेइंग 11..

जगातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या टी २० लीग आयपीएलच्या १६ व्या पर्वाची सुरुवात ३१ मार्चपासून होणार आहे. या स्पर्धेत दहा संघ सहभागी होतील. पहिला सामना हा गुजरात टायटन्स आणि चार वेळा विजेता ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात होईल.

चेन्नईचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनी सांभाळणार आहे. तर गुजरात संघाची धुरा ऑलराउंडर हार्दिक पंड्याच्या खांद्यावर असेल. हा सामना काही दिवसांवर आलेला असतानाच, आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक मार्क बाउचर यानं पत्रकार परिषद घेतली. यात त्यानं सूर्यकुमार यादव खेळणार की नाही, त्याला संधी मिळणार की नाही या अन् अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

Suryakumar Yadav
Rohit Sharma IPL Records: हिटमॅन रोहित आहे IPL चा 'झिरो नंबर १' तब्बल इतक्यांदा झालाय शून्यावर बाद..

मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादववर सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत तो सपशेल अपयशी ठरला होता. सलग तीन सामन्यांत तो पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे त्याला मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग ११ मध्ये संधी देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचवेळी मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक मार्क बाउचरनं त्याचं समर्थन केलंय.

कोणत्याही खेळाडूच्या फॉर्मचं मूल्यांकन तो पहिला चेंडू कसा खेळला यावरून होत नाही, असं बाउचर म्हणाला. यावरून लक्षात येतं की, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापन पूर्णपणे सूर्यकुमारच्या बाजूने आहे आणि त्याला सर्वाधिक संधी दिली जाईल.

मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक मार्क बाउचर म्हणाला की, ''कोणताही खेळाडू पहिल्या चेंडूवर कसा खेळतो यावरून त्याचा फॉर्म ठरवू शकत नाही. मी त्याच्याशी बोललो आहे. तुला काय वाटतं अशी विचारणा मी सूर्याला केली होती. त्यावर मी चेंडू खूप चांगल्या रितीने खेळून काढतोय असं उत्तर त्यानं दिलं.''

जर एखादा खेळाडू पहिला चेंडू खेळून काढण्यात अपयशी ठरला असेल तो खेळाडू फॉर्ममध्ये नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. दुर्दैवाने तो मागील तिन्ही सामन्यांत चांगली कामगिरी करू शकला नाही. आयपीएलमध्ये तो पहिल्या चेंडूचा सामना करेल तेव्हा प्रेक्षक त्याचा उत्साह नक्कीच वाढवतील अशी अपेक्षा आहे, असंही बाउचर म्हणाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com