CSK Ban News : चेन्नई सुपर किंग्स संघावर बंदी घालणार? तामिळनाडू विधानसभेत गाजला मुद्दा; काय आहे प्रकरण?

IPL News : एकीकडे धोनीची सीएसके चांगल्या फॉर्मात असताना आता संघावर बंदीची मागणी जोर धरु लागली आहे.
CSK News
CSK News Saam TV

IPL 2023 News : इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात दणक्यात झाली आहे. आज चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मोसमातला 17 वा सामना आज खेळवला जाणार आहे. चेन्नईने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. त्यात त्यांना दोन सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. एकीकडे धोनी ब्रिगेड चांगल्या फॉर्मात असताना आता संघावर बंदीची मागणी जोर धरु लागली आहे.

पट्टाली मक्कल काची पक्षाचे (PMK) आमदार एसपरी वेंकटेश्वर यांनी चेन्नई सुपर किंग्स संघावर बंदी घालण्याची मागणी सरकारकडे केली आहे. कारण संघात तामिळनाडूतील एकही खेळाडू नाही. वेंकटेश्वर यांनी विधानसभेत म्हटलं की, राज्यात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. मात्र सीएसकेने आपल्या 27 जणांच्या संघात एकाही खेळाडूला संधी दिली नाही.

CSK News
Suryakumar Yadav In IPL 2023: मुंबईचा 'सूर्या'स्त, सलग ६ सामन्यात चौथ्यांदा गोल्डन डक वर बाद; संघाबाहेर होण्याची भिती

सीएसके तामिळनाडूचं नाव वापरुन मोठी कमाई करत आहे. मात्र राज्यातील एकाही खेळाडूला संघात स्थान नाही. त्यामुळे हा चिंतेचा विषय आहे. मला विश्वास आहे की मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री याबाबत योग्य ती कारवाई करतील, अशी आशा वेंकटेश्वर व्यक्त केली आहे.  (Latest sports updates)

CSK News
CSK vs RR Match Prediction: गुरू की शिष्य कोण मारणार विजयाची हॅटट्रिक? पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

चेन्नईचा आयपीएलमधील प्रवास

चेन्नई सुपर किंग्जने चार वेळा आयपीएल जेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये सीएसकेने IPL ट्रॉफी जिंकली. 2016 आणि 2017 मध्ये सीएसके संघाला आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली होती, परंतु त्यानंतर 2018 मध्ये संघाने पुनरागमन केले आणि विजेतेपद पटकावले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com