IPL 2023 News: अश्विन बॉलिंग करताना अचानक थांबला; बाऊंड्रीवर उभ्या असलेल्या बटलरकडे वळला कॅमेरा, नेमकं काय झालं?

IPL 2023 News: पंजाब किंग्जच्या फलंदाजीदरम्यान अश्विन पुन्हा एकदा मांकडिंगमुळे चर्चेत आला.
IPL 2023 News
IPL 2023 NewsSaam TV

IPL 2023 News : पंजाब आणि राजस्थान यांच्यात झालेल्या कालच्या सामन्यादरम्यान 2019 च्या आयपीएलमध्ये घडलेला एक किस्सा अनेकांना आठवला. आर अश्विनने कालच्या सामन्यात गोलंदाजी करताना शिखर धवनला मांकडिंग करत बाद करण्याची संधी होती. मात्र अश्विनने धवनला बाद न करता केवळ वॉर्निंग दिली. मात्र हे घडत असताना कॅमेऱ्यामनने अचानक आपला फोकस जॉस बटलरकडे वळवला.

पंजाब किंग्जच्या फलंदाजीदरम्यान अश्विन पुन्हा एकदा मांकडिंगमुळे चर्चेत आला. अश्विनच्या गोलंदाजी करताना शिखर धवन नॉन-स्ट्रायकर एंडला उभा होता. धवन चेंडू टाकायच्या आधीच क्रीझमधून बाहेर पडत होता. अश्विनच्या हे लक्षात येतात त्याने चेंडू न फेकता थांबला. बाद होण्याच्या भीतीने धवन देखील क्रीजमध्ये परतला. अश्विनकडे धवनला बाद करण्याची संधी होती. पण त्याने फक्त वॉर्निग दिली. (IPL 2023 News)

IPL 2023 News
Police Man Viral Video: वर्दीतला अवलिया! पोलिसाने गायले अरिजित सिंगचे गाणे; जादूई आवाजावर नेटकरी फिदा; VIDEO तुफान VIRAL

यानंतर कॅमेरामनने बाऊंड्रीवर उभ्या असलेल्या जॉस बटरलकडे कॅमेरे वळवले. त्यावेळी अनेकांना 2019 च्या आयपीएलमधील जॉस बटलरची विकेट आठवली. अश्विनने आयपीएल 2019 मध्ये बटलरला अशाच पद्धतीने बाद केलं होतं. त्यावेळी मोठा बादही झाला होता.

मांकडिंग काय आहे?

क्रिकेटमध्ये मांकडिंगच्या नियमाबाबत नेहमीच वाद झाले आहेत. या नियमानुसार, गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटण्यापूर्वी जेव्हा फलंदाज नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला आपली क्रीज सोडतो, अशा स्थितीत गोलंदाज प्रसंगावधान राखत त्या फलंदाजाला स्टंपवरील बेल्स उडवून बाद करू शकतो असा नियम आहे.

IPL 2023 News
Mumbai Viral News: माणुसकीचा गारवा! रिक्षावाल्याच्या कृतीने जिंकली मुंबईकरांची मने; प्रवाशांसाठी चक्क फुकटात देतोय...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com