IPL 2023 News : RCBने सचिनचं ट्वीट पाहिलं नाही वाटतं? लखनौच्या विजयानंतर सचिनचा अंदाज खरा ठरला

Sachin Tendulkar Prediction Tweet: लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेन्जर्स बँगलोरचा 1 विकेटने पराभव केला.
Sachin Tendulkar
Sachin TendulkarSaam Tv

IPL 2023 News: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 15व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेन्जर्स बँगलोरचा 1 विकेटने पराभव केला. शेवटच्या चेंडूपर्यंत चढ-उतारांनी भरलेला हा रोमहर्षक सामना क्रिकेट चाहत्यांना स्मरणात नक्की राहिल.

कारण चौकार षटकारंचा अक्षरश: पाऊस या सामन्यात पाहायला मिळाला. मात्र बँगलोरने लखनौला हलक्याने घेतल्याने धावांचा डोंगर उभारूनही त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढावल्याची टीका होत आहे. मात्र बँगलोरने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं ट्वीट पाहिलं असतं कदाचित सामना त्यांच्या हातातून निसटला नसता.

Sachin Tendulkar
LSG vs RCB Highlights : स्टॉयनिस-पूरनने आरसीबीला धुतलं; शेवटच्या चेंडूवर लखनौचा थरारक विजय

RCBच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच चिन्नास्वामी स्टेडियम कालचा सामना पार पडला. लखनौने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसची ओपनिंग पार्टनरशिप ग्लेन मॅक्सवेलसाठी परफेक्ट लॉन्चपॅड आहे. त्यामुळे बँगलोरला मोठी धावसंख्या उभारता आली. पण मला वाटते की या मैदानात 210 धावसंख्याही देखील सुरक्षित राहणार नाही, असं सचिनने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. (Sports News)

सचिन तेंडुलकरचं म्हणणं अवघ्या काही तासात खरं ठरलं. पहिल्या 6-7 ओव्हरमध्ये आरसीबीच्या कंट्रोलमध्ये असलेला सामना अचानक लखनौच्या बाजूने झुकला. अवघ्या 23 धावांत तीन गडी गमावल्यानंतर संघाने हा सामना एका विकेटने जिंकला.

Sachin Tendulkar
Saamana Editorial News: सुडाच्या राजकारणात रमलेल्यांना शेतकऱ्यांचे दुःख समजून घेण्यासाठी वेळ नाही; सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

पाचव्या क्रमांकावर आलेल्या मार्कस स्टॉइनिसने अवघ्या 30 चेंडूत 65 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या निकलस पुरानने वादळी खेळी करत अवघ्या 19 चेंडूत 62 धावा ठोकल्या. आयुष बडोनीने 24 चेंडूत 30 धावांची खेळी केली. अखेरच्या चेंडूवर लखनौने एक विकेटने हा सामना जिंकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com