MI vs LSG Playoffs: सूर्यकुमार-ग्रीनची धुव्वाधार फलंदाजी; पण नवीनने एका षटकात फिरवला गेम, मुंबईची १८३ धावांपर्यंत मजल

MI vs LSG Playoffs Match Updates: मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना लखनऊसमोर विजयासाठी १८३ धावांचं लक्ष ठेवलं आहे.
MI vs LSG Playoffs Match Updates:
MI vs LSG Playoffs Match Updates:Saam TV

MI vs LSG Playoffs Match Updates: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघात सुरू आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना लखनऊसमोर विजयासाठी १८३ धावांचं लक्ष ठेवलं आहे. मुंबईकडून कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा वगळता एकाही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. लखनऊकडून नवीन उल हकने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.  (Latest sports updates)

MI vs LSG Playoffs Match Updates:
Ruturaj Gaikwad Catch: अद्भुत, अविश्वसनीय! तुफानी खेळीनंतर ऋतुराजचा मॅच विनिंग कॅच; VIDEO एकदा पाहाच

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात   मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या ३ षटकात ३० धावा ठोकल्या. इशान किशन आक्रमक फलंदाजी करत होता तर रोहित शर्मा त्याला सावध साथ देत होता.

मात्र, चौथ्या षटकात वेगवान गोलंदाज नवीन उल हकने रोहित शर्माला बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला. रोहितने १० चेंडूत ११ धावांची खेळी केली. त्यानंतर पुढच्याच षटकात यश ठाकूरने इशान किशनला माघारी पाठवलं. किशनला केवळ १५ धावा करता आल्या. लागोपाठ दोन धक्के बसल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमरून ग्रीन यांनी मुंबई इंडियन्सचे रनरेट खाली येऊ दिले नाही.  (Indian Premier League 2023)

सूर्यकुमार आणि ग्रीनने मिळून लखनऊच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मुंबई या दमदार सुरूवातीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असतानाच नवीन उल हकने आधी सूर्याला आणि मग ग्रीनला बाद करत पाठोपाठ (Cricket News) दोन धक्के दिले. सूर्यकुमारने २० चेंडूत ३३ धावा तर ग्रीनने २३ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. त्यानंतर तिलक वर्माने मुंबईची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सुद्धा २१ चेंडूत २२ धावा काढून बाद झाला.

दरम्यान, शेवटच्या काही षटकात नेहाल वडेराने फटकेबाजी करत मुंबईला १७० धावांचा टप्पा पार करून दिला. त्यामुळे वडेराच्या फटकेबाजीमुळे (Sport News) मुंबईला निर्धारीत २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात १८२ धावा करता आल्या. वडेरा १२ चेंडूत २३ धावा काढून शेवटच्या चेंडूवर बाद झाला. लखनऊकडून नवीन उल हकने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर यश ठाकूर ३ आणि मोसिन खानने १ विकेट घेतली.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com