IPL 2023 Playoffs Race: मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी एकच मार्ग शिल्लक! रोहित सेनेला करावं लागेल हे काम

IPL Playoffs Scenario: मुंबई इंडियन्स संघ अजूनही अडचणीत आहे.
mumbai indians
mumbai indians saam tv

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. गुजरात टायटन्स संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर उर्वरित ३ स्थानांसाठी ६ संघांमध्ये जोरदार लढत सुरु आहे.

काही संघ असे आहेत ज्यांना प्लेऑफमध्ये जाण्याचा सर्वाधिक चान्स आहे. तर काही संघ असे देखील आहेत ज्यांना विजय मिळवूनही दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. दरम्यान मुंबई इंडियन्स संघ अजूनही अडचणीत आहे.

mumbai indians
IPL 2023 Playoffs Race: डायरीत नोट करून ठेवा! हेच '४' संघ करणार Playoff मध्ये प्रवेश

अंतिम ४ मध्ये मुंबईचा संघ कसा पोहोचणार?

मुंबई इंडियन्स संघाबद्दल बोलायचं झालं तर १३ पैकी ७ सामने जिंकून मुंबई इंडियन्स संघाचे १४ पॉईंट्स आहेत. हा संघ पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्स संघाचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबाद संघासोबत रंगणार आहे.

जर मुंबईने या सामन्यात विजय मिळवला तर मुंबईचे १६ पॉईंट्स होतील. मात्र नेट रन रेटमुळे मुंबईचा संघ अडचणीत येऊ शकतो. मुंबई इंडियन्स संघाचा नेट रन रेट हा - ०.१२८ इतका आहे. त्यामुळे मुंबईला केवळ जिंकायची नाही तर, मोठया फरकाने विजय मिळवण्याची गरज आहे.

या संघाकडून मुंबई इंडियन्स संघाला धोका

मुंबई इंडियन्स संघाला लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून धोका असू शकतो. कारण लखनऊ आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांचे पॉईंट्स १४ आहेत. (Latest sports updates)

mumbai indians
IPL Playoffs Scenario: केवळ विजय नव्हे तर दिल्लीविरुद्ध पराभूत होऊनही CSK जाणार प्लेऑफमध्ये! फक्त धोनीला करावं लागेल 'हे' काम

मात्र लखनऊचा नेट रन रेट हा +०.१८० इतका आहे. तर आरसीबीचा संघ चौथ्या स्थानी आहे. जर येणाऱ्या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला तर आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकतो. तर लखनऊचा संघ १३ सामन्यांमध्ये १५ पॉंईंससह तिसऱ्या स्थानी आहे. जर कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूध्द होणाऱ्या सामन्यात लखनऊ संघाचा पराभव झाला तर मुबंई इंडियन्स संघाचा चान्स वाढणार आहे.

राजस्थान आणि कोलकाताचा संघ शर्यतीत..

तर राजस्थान आणि कोलकाताचा संघ देखील शर्यतीत आहे. राजस्थान रॉयल्स संघाचे १४ पॉईंट्स आहेत. तर कोलकोताचे १२ पॉईंट्स आहेत. दोन्ही संघांचा एक एक सामना शिल्लक आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com