IPL 2023 Playoffs: LSG विरुद्धच्या पराभवानंतर मुंबई स्पर्धेतून बाहेर? तर या २ संघांची लागली लॉटरी; पाहा समीकरण

IPL 2023 Points Table: लखनऊ सुपर जायंट्सच्या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
ipl points table
ipl points table saam tv

LSG VS MI,IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ६३ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या रोमांचक सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संधाने मुंबई इंडियन्स संघावर ५ धावांनी विजय मिळवला आहे.

या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला १७२ धावा करता आल्या.

लखनऊ सुपर जायंट्सच्या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. (IPL Playoffs)

ipl points table
IPL 2023, MI vs LSG: रोहित शर्माची एक चूक अन् स्टॉयनिसने साधली संधी; लखनौचे मुंबईला १७८ धावांचे आव्हान

पॉइंट्स टेबलची स्थिती..

मुंबईला पराभूत करणारा लखनऊचा संघ १५ पॉइंट्ससह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर १३ सामन्यांमध्ये १४ पॉइंट्ससह मुंबईचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. आता दोन्ही संघांचे १-१ सामने शिल्लक आहेत.

जर लखनऊने पुढच्या सामन्यात विजय मिळवला, तर लखनऊचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे.

तर मुंबई इंडियन्सने जर पुढचा सामना जिंकला तरी या संघांचे १६ गुण होतील. अशा स्थितीत मुंबईला इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. (IPL Points table)

ipl points table
IPL 2023 Points Table: गुजरातचा Playoff मध्ये प्रवेश! अजूनही ७ संघांना संधी; पाहा काय आहे समीकरण

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - पंजाब किंग्जला समान संधी..

मुंबईच्या पराभवानंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज संघाला देखील समान संधी असणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला अधिक संधी आहे. कारण या संघाचे देखील १२ पॉइंट्स आहेत.

मात्र नेट रन रेट हा +०.१६६ इतका आहे. त्यामुळे जर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने येणारे दोन्ही सामने जिंकले तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ देखील प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. तर पंजाब संघाचे देखील १२ पॉइंट्स आहेत.

मात्र त्यांचा नेट रन रेट -०.२६८ इतका आहे. जर पंजाबला प्लेऑफमध्ये जायचं असेल तर त्यांना येणारे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. (Latest sports updates)

ipl points table
Arjun Tendulkar IPL 2023: अर्जुनचं मुंबई संघात कमबॅक करणं कठीण! रोहित 'या' कारणामुळे ठेवतोय संघाबाहेर

चेन्नईचा संघ देखील प्लेऑफच्या शर्यतीत...

चेन्नई सुपर किंग्ज संघ देखील प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. १३ सामन्यांमध्ये १५ पॉइंट्ससह चेन्नईचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.

चेन्नईला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी केवळ १ सामना जिंकण्याची गरज आहे. गुजरात टायटन्स संघ हा प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com