IPL 2023 Points Table: RCB साठी 'करो या मरो', पराभुत होताच मुंबई नव्हे तर 'हे' २ संघ थेट करणार Playoff मध्ये प्रवेश

SRH vs RCB Playing 11: हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे.
ipl points table
ipl points table saam tv

SRH vs RCB,IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज रोमांचक सामना रंगणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे.

तसेच प्लेऑफच्या दृष्टीने देखील हा सामना अतिशय महत्वाचा आहे. कारण आजच्या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर होऊ शकतो.

ipl points table
IPL 2023 Points Table: दिल्लीच्या विजयाने वाढलं पंजाबचं टेन्शन! तर 'हे' ३ संघ करू शकतात Playoff मध्ये प्रवेश

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी अतिशय महत्वाचा सामना..

हैदराबादविरुध्द होणारा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ मुंबई इंडियन्सला मागे टाकत पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी विराजमान होणार आहे.

मुंबई इंडियन्स संघ सध्या १४ पॉइंट्ससह चौथ्या स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ १२ पॉइंट्ससह पाचव्या स्थानी आहे. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नेट रन रेट हा प्लसमध्ये आहे. तर मुंबईचा नेट रन रेट हा मायनल्समध्ये आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या पराभवानं या संघाचं नशीब उजळणार...

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठीच नव्हे तर इतर संघांसाठी देखील हा सामना तितकाच महत्वाचा असणार आहे. कारण जर या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पराभव झाला तर, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाला थेट प्लेऑफमध्ये जाण्याची संधी मिळू शकते. (Latest sports updates)

ipl points table
IPL Points Table: CSK अन् MI ची चिंता वाढली! सोप्या भाषेत समजून घ्या प्लेऑफचं समीकरण

तसेच जर मुंबई इंडियन्स संघाने पुढचा सामना मोठ्या फरकाने जिंकला तर मुंबईला देखील प्लेऑफमध्ये प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे प्लेऑफसाठी आजचा सामना निर्णायक ठरू शकतो. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादचा संघ या स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

अशी असू शकते दोन्ही संभावित संघांची प्लेइंग ११

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू:

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरर, मायकेल ब्रेसवेल, अनुज रावत, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वेन पारनेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि कर्ण शर्मा.

सनरायझर्स हैदराबाद:

अनमोलप्रीत सिंग, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार ), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, मार्को जानसेन, फजलहक फारुकी, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com