RCB vs SRH Match Result: आरसीबीच्या विजयानंतर मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; प्लेऑफचा मार्ग झाला कठीण, पाहा समीकरण

RCB vs SRH Match Result: प्लेऑफच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या सामन्यात आरसीबीने हैदराबादवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला.
ipl 2023 rcb vs srh virat kohli make century royal challengers bangalore beat sunrisers hyderabad by 8 wicket ssd92
ipl 2023 rcb vs srh virat kohli make century royal challengers bangalore beat sunrisers hyderabad by 8 wicket ssd92IPL 2023/ Twitter

RCB vs SRH Match Result: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ६५ वा सामना रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि सनराईज हैदराबाद यांच्यात झाला. प्लेऑफच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या सामन्यात आरसीबीने हैदराबादवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला.

आरसीबीकडून विराट कोहलीने शानदार शतकी खेळी केली. कोहलीने ६२ चेंडूत १०० धावा कुटल्या. त्याला कर्णधार फाफ डू प्लेसिसने ७१ धावा काढून चांगली साथ दिली. या विजयासह आरसीबीने प्लेऑफच्या फेरीत आपली दावेदारी कायम ठेवली असून मुंबई इंडियन्सच्या संघाचं टेन्शन वाढवलं आहे. (Latest sports updates)

राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना आरसीबीसमोर विजयासाठी १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची सलामी जोडी विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी तडाखेबाज सुरूवात केली.

ipl 2023 rcb vs srh virat kohli make century royal challengers bangalore beat sunrisers hyderabad by 8 wicket ssd92
WTC Final आधीच बीसीसीआयची मोठी घोषणा; टीम इंडियाच्या यशाची १०० टक्के गॅरंटी

विराट आणि फाफने पावरप्लेमध्ये हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच (Sport Updates) धुलाई केली. दोघांनी मिळून पहिल्या ६ षटकात नाबाद ६५ धावा कुटल्या. विराट कोहलीने चांगल्या स्ट्राईक रेटने धावा करत दमदार सुरूवात केली. त्यानंतर फाफ ड्युप्लेसिसने आपला गिअर बदलला. विराट आणि फाफने हैदराबादच्या फलंदाजीपुढे हैदराबादच्या गोलंदाजींनी नागी टाकली.

दरम्यान, १८ व्या षटकात विराट कोहलीने षटकार ठोकत आपलं शतक पूर्ण केलं. कोहलीचं हे आयपीएलमधील सहावं शतक ठरलं. शतकानंतर कोहली लगेचच बाद झाला. त्याने ६२ चेंडूत १०० धावा कुटल्या. या खेळीत १२ चौकार आणि ४ सणसणीत षटकारांचा समावेश होता.

विराट कोहली बाद झाल्यानंतर फाफ डू प्लेसिसही लगेच बाद झाला. मात्र तोपर्यंत सामना आरसीबीच्या हातात आला होता. फाफने ४७ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. या खेळीत ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. शेवटी विजयासाठी काही धावांची गरज असताना ग्लेन मॅक्सवेल फलंदाजासाठी आला. आरसीबीला विजय मिळवून दिला.

तत्पुर्वी प्रथम फलंदाजासाठी उतरलेल्या (Cricket News)  हैदराबादची सुरूवात अत्यंत खराब झाली. डावखुरा गोलंदाज ब्रेसवेलने सलामीवीर अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठीला झटपट माघारी पाठवलं. अभिषेक शर्माला ११ धावा तर राहुल त्रिपाठीला १५ धावा काढून बाद झाला.

सलग दोन धक्के बसल्यानंतर हेन्री क्लासेन आणि कर्णधार एडिन माक्ररमने हैदराबादचा डाव सावरला. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेट्साठी ७६ धावांची भागीदारी केली. मात्र, फाफ डू प्लेसिसने शाहबाज अहमदकडे चेंडू सोपावला.त्याने माक्ररमला बाद करत ही जोडी फोडली.

माक्ररम २० चेंडूत १८ धावा काढून बाद झाला. त्यानंतर मैदानावर फलंदाजासाठी उतरलेल्या हॅरी ब्रुकने क्लासेनची चांगली साथ दिली. दोघांनी मिळून आरसीबीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. हेनरी क्लासेनने ५१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. १९ व्या षटकात तो हर्षल पटेलला मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला.

क्लासेनने आपल्या खेळीत ८ चौकार आणि ६ षटकार लगावले. शेवटच्या काही षटकात हॅरी ब्रुकने फटकेबाजी करत हैदराबादला १८६ धावांपर्यंत पोहचवले. आरसीबीकडून मायकल ब्रेसवेलने २ विकेट्स घेतल्या. याशिवाय हर्षल पटेल, मोहमद सिराज आणि शाहबाज अहमदने प्रत्येकी १-१ विकेट्स घेतली.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com