IPL 2023 Points Table: राजस्थानच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर! मुंबईची चिंता वाढली, तर KKR थेट बाहेर

IPL Points Table: राजस्थानच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
ipl points table
ipl points table saam tv

KKR VS RR IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने जोरदार कामगिरी करत कोलकाता नाईट रायडर्स संघावर जोरदार विजय मिळवला आहे.

राजस्थान रॉयल्स संघाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल या सामन्याचा हिरो ठरला आहे. त्याने या डावात नाबाद ९८ धावांची खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

दरम्यान या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. (IPL Points Table)

ipl points table
Yashasvi Jaiswal: मानलं रे भावा! मुंबईकर जयस्वालने तुफानी खेळी करत IPL स्पर्धेत रचला इतिहास

राजस्थान रॉयल्स संघाने या सामन्यात विजय मिळवत पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उसळी घेतली आहे. राजस्थान रॉयल्स संघ आता पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर दुसरीकडे घरच्या मैदानावर पराभूत झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा धक्का बसला आहे. नीतीश राणाच्या नेतृत्वाखाली खेळणारा कोलकाता नाईट रायडर्स संघ आयपीएल २०२३ स्पर्धेतील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.

राजस्थान रॉयल्स संघ १२ गुणांसह दमदार नेट रन रेटच्या जोरावर तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. तर १० गुणांसह सातव्या स्थानी असलेला कोलकाता नाईट रायडर्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाचे २ सामने शिल्लक आहेत. जर त्यांनी २ सामने जिंकले तरी १४ गुण होतील. हे गुण त्यांना प्लेऑफ फेरीत पोहचवण्यासाठी पुरेसे नसतील. (Latest sports updates)

ipl points table
IPL Points Table: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार IPL 2023 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश

गुजरातचा संघ अव्वल स्थानी विराजमान

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वखाली खेळणारा गुजरात टायटन्स संघ सध्या १६ गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज संघ १५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. आता जोरदार विजय मिळवून राजस्थान रॉयल्स संघाने १२ गुणांसह तिसरे स्थान गाठले आहे.

तर राजस्थानच्या विजयाचा फटका मुंबई इंडियन्स संघाला बसला आहे. १२ गुणांसह तिसऱ्या स्थानी असलेला मुंबई इंडियन्स संघ आता चौथ्या स्थानी घसरला आहे.

केएल राहुलच्या अनुपस्थितीत खेळत असलेला लखनऊ सुपर जायंट्स पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी पोहोचला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज संघ प्रत्येकी १०-१० गुणांसह सहाव्या, सातव्या आणि आठव्या स्थानी आहे. तर सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्रत्येकी ८-८ गुणांसह नवव्या आणि दहाव्या स्थानी आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com