IPL 2022: समारोपाच्या कार्यक्रमात दिग्गजांची उपस्थिती; BCCI दाखवणार अनोखा कार्यक्रम

या कार्यक्रमात BCCI भारतीय क्रिकेटचा प्रवास दाखवणार आहे, त्याचबरोबर...
IPL 2022
IPL 2022Saam TV

BCCI ने IPL 2022 चा समारोप समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. एका रिपोर्टनुसार, बॉलीवूड स्टार रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि संगीतकार एआर रहमान या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान बीसीसीआय भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे अनोख्या पद्धतीने साजरे करणार आहे.

आयपीएलचा (IPL 2022) समारोप सोहळा अहमदाबादमध्ये यंदाच्या हंगामाच्या अंतिम सामन्यापूर्वी होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, समारोप समारंभ एकूण ४५ मिनिटांचा असणार आहे. BCCI ने समारोप समारंभाचे आयोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी एक एजन्सी नियुक्त केली आहे. एआर रहमान आणि रणवीर सिंग हे कलाकार समारोप कार्यक्रमात परफॉर्म करताना दिसणार आहेत. बीसीसीआय भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करणार आहे त्याचबरोबर भारतीय क्रिकेटचा प्रवासही दाखवेल.

IPL 2022
दुभती म्हैस, पाच बकरे जिंकण्यासाठी ५०० मल्ल आखाड्यात; नागेश राक्षेने मारली बाजी

BCCI भारतीय क्रिकेट संघाच्या सर्व माजी कर्णधारांना समारोप समारंभासाठी आमंत्रित करण्याची योजना आखत आहे. स्वातंत्र्याच्या सुमारे ७५ वर्षे आणि गेल्या ७ दशकांमध्ये भारतीय क्रिकेटचा कसा विकास झाला, ही या कार्यक्रमाची संपूर्ण थीम असणार आहे.

टाटा इंडियन प्रीमियर लीग प्लेऑफ आणि फायनल 24 मे ते 29 मे 2022 या कालावधीत कोलकाता आणि अहमदाबाद येथे खेळली जाणार आहे. पहिला क्वालिफायर 24 मे आणि 25 मे रोजी एलिमिनेटर कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 27 आणि 29 मे रोजी अनुक्रमे क्वालिफायर 2 आणि टाटा आयपीएलची फायनल होणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com