
GT vs SRH Live Score: गुजरात टायटन्सने हैदराबादसमोर 189 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक 101 धावा केल्या. तर साई सुदर्शनने 47 धावांची खेळी करत शुभमनला साथ दिली. या दोघांशिवाय गुजरातच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
सनरायझर्स हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने पाच विकेट घेतल्या. मार्को जॅनसेन, फजलहक फारुकी आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी एक विकेट पटकावली.
प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरातजी आज सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात सलामीवीर ऋद्धिमान साहा शुन्यावर बाद झाला. साहा बाद झाल्यानंतर आलेल्या साई सुदर्शन आणि शुभमन गिलने गुजरातचा डाव सावरला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 147 धावांची पार्टनरशिप केली. मात्र 15व्या षटकात त्याला मार्को जॅनसेनने बाद केले.
शेवटच्या षटकात चार विकेट
साई सुदर्शन बाद झाल्यानंतर गुजरातच्या संघाला गळतीच लागली. कर्णधार हार्दिक पंड्याने 6 चेंडूत 8 धावांवर बाद झाला. डेव्हिड मिलर 5 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या राहुल तेवतियाने 3 धावा तर दासून शनाकाने 9 धावा केल्या. शेवटच्या षटकात तर गुजरातने चार विकेट गमावल्या. भुवनेश्वर कुमारने शेवटच्या षटकात अवघी एक धाव देत तीन विकेट घेतल्या. (Latest sports update in marathi)
शुभमन गिलचे पहिलं IPL शतक
आयपीएलच्या 16 व्या मोसमात शुभमन गिल भलत्यात फॉर्मात दिसत आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात गिलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावलं. या सामन्यापूर्वी गिलची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 96 धावा होती. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात गिलने 56 चेंडूत शतक पूर्ण केले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.