Kieron Pollard Retires: कायरन पोलार्डची निवृत्तीची घोषणा, मात्र सामन्यांदरम्यान मैदानात दिसणार, MIकडून मोठी जबाबदारी

Kieron Pollard Retires: पोलार्डने 2010 मध्ये मुंबईसाठी आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि 2022 पर्यंत संघासाठी खेळत राहिला.
Kieron Pollard
Kieron Pollard Saam TV

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगची ( IPL) रिटेन्शन लिस्ट बाहेर येण्यापूर्वीच मोठा बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्स टीमचा स्फोटक फलंदाज ऑलराऊंडर कायरन पोलार्डने (Mumbai Indians) निवृत्तीची घोषणा केली आहे.13 वर्षे मुंबई इंडियन्सकडून खेळणारा कायरन पोलार्डने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा करत भावूक झाला.

मात्र पोलार्ड मुंबई इंडियन्ससोबतच राहणार आहे. पोलार्ड पुढील आयपीएल सीजनमध्ये मुंबई संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे. पोलार्डने निवृत्तीसाठी लिहिलेल्या पोस्टमध्ये त्याने याबाबतची माहिती दिली आहे.

Kieron Pollard
Team India : बीसीसीआय घेणार मोठा निर्णय; टी-२० सामन्यांसाठी हार्दिक पांड्याला मिळणार कर्णधारपदाची जबाबदारी?

कायरन पोलार्डने म्हटलं की, माझ्यासाठी हा निर्णय सोपा नव्हता, पण मुंबई इंडियन्सशी झालेल्या दीर्घ चर्चेनंतर मी यापुढे आयपीएलमध्ये खेळणार नाही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे. जर मला मुंबई इंडियन्ससोबत खेळता येत नसेल तर मी कोणत्याही टीमध्ये खेळणार नाही. मात्र हा भावनिक निरोप नाही कारण मी मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षकपद स्वीकारले आहे.

पोलार्डने 2010 मध्ये मुंबईसाठी आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि 2022 पर्यंत संघासाठी खेळत राहिला. त्याने अनेक वेळा संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे आणि तो संघातील सर्वात दिग्गज खेळाडूंपैकी एक होता. पोलार्डचा मुंबईने उत्कृष्ट फिनिशर म्हणून वापर केला. तसेच गोलंदाजीच्या करत त्याने महत्त्वाच्या प्रसंगी विकेट्सही घेतल्या.

Kieron Pollard
T-20 Word Cup: टीम इंडियाच्या जखमेवर पाकच्या पंतप्रधानांनी मीठ चोळलं; इरफान पठाणने भरली सणसणीत मिर्ची

पोलार्डची आयपीएल कारकीर्द

पोलार्डने 189 आयपीएल सामने खेळले, ज्यामध्ये 16 अर्धशतकांसह 3412 धावा केल्या. पोलार्डच्या नावावर आयपीएलमध्ये एकूण 223 षटकार आहेत, तर गोलंदाजीतही त्याच्या नावे एकूण 69 विकेट्स आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com