IPL Final 2023: गर्जा महाराष्ट्र माझा! 'या' मराठमोळ्या खेळाडूंनी बनवलं 'चेन्नई'ला चॅम्पियन

CSK vs GT, IPL 2023 : रविंद्र जडेजा या सामन्याचा हिरो ठरला असला तरी चेन्नईला चॅम्पियन करण्यात मराठी खेळाडूंचा मोठा वाटा राहिला.
CSK IPL 2023
CSK IPL 2023Saamtv

IPL Final 2023: आयपीएलच्या १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने जेतेपदावर नाव कोरंल आहे. आयपीएलच्या इतिहासात चारवेळा जेतेपद जिंकणाऱ्या चेन्नईने धोनीच्या नेतृत्वात यंदाच्या हंगामातही आयपीएलचा किताब जिंकला आहे. चेन्नईने आता पाचवेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली असून मुंबई इंडियन्सशी बरोबरी केली आहे.

स्टार खेळाडू रविंद्र जडेजा या सामन्याचा हिरो ठरला असला तरी चेन्नईला चॅम्पियन करण्यात मराठी खेळाडूंचा मोठा वाटा राहिला. कोणते आहेत चेन्नईला विजयाकडे घेवून जाणारे मराठी शिलेदार चला जाणून घेवू...

CSK IPL 2023
IPL Final Winner: जडेजाचा अंतिम चेंडूवर चौकार अन् CSK ने पाचव्यांदा कोरलं जेतेपदावर नाव

यंदा चेन्नई संघाच्या प्लेईंग ११ मध्ये कमीत कमी चार खेळाडू मराठी दिसत आहेत. यामध्ये सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे आणि तुषार देशपांडे याचा समावेश आहे. 

ऋतुराज गायकवाड - चेन्नईची सलामीची फलंदाजी सांभाळण्यात ऋतूराजने महत्वाची भूमिका बजावली आहे. यंदाच्या मोसमात ऋतूराजने २ वादळी अर्धशतकांसह चेन्नईसाठी सलामीला येवून निर्णायक धावसंख्या उभारण्यास मदत केली..

अजिंक्य रहाणे - यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच चेन्नईच्या ताफ्यात आलेल्या अजिंक्य रहाणेने यंदाचे पर्व चांगलेच गाजवले. शेवटच्या सामन्याचाही हिरो ठरलेल्या अजिंक्यने मोक्याच्या क्षणी १३ चेंडूत २२ धावा कुटल्या. त्यामुळेच धोनीच्या संघाला विजय सोपा झाला...

CSK IPL 2023
IPL 2023 Winner: गुजरातला नमवत थालाची CSK ठरली IPL चॅम्पियन! पाचवे जेतेपद मिळवत केली मुंबईची बरोबरी

तुषार देशपांडे- चेन्नईसाठी तुषार देशपांडे हा छोटा पॅकेट बडा धमाका ठरला. तुषार देशपांडेने पावरप्लेमध्ये जबरदस्त गोलंदाजी करताना संपूर्ण हंगामात ११ बळी मिळवले. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सला गोलंदाजीची भीस्त या महाराष्ट्राच्या युवा गोलंदाजावर राहिली... (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com