Irfan Pathan Tweet: 'शेजाऱ्यांनी टीव्हीसोबत आता...',टीम इंडियाच्या दणदणीत विजयानंतर पठाणने उडवली पाकिस्तानची खिल्ली!

India vs Pakistan: या सामन्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठानने मजेशीर ट्विट केले आहे.
irfan pathan tweet
irfan pathan tweet twitter

Irfan Pathan Tweet:

कोलंबोच्या मैदानावर सोमवारी (११ सप्टेंबर) केएल राहुल अन् विराट नावाचं वादळ आलं होतं. या वादळात पाकिस्तानचा संपूर्ण संघ वाहून गेल्याचे पाहायला मिळाले आहे. राखीव दिवसाचा खेळ झाल्यानंतर भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच पाक गोलंदाजांवर हल्ला चढवला.

भारताने दिलेल्या ३५७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला केवळ १२८ धावा करता आल्या. यासह भारताने हा सामना २२८ धावांनी जिंकला आहे.

या विजयानंतर माजी भारतीय खेळाडूंनी ट्विट करत पाकिस्तानी खेळाडूंची खिल्ली उडविली आहे.

irfan pathan tweet
Babar Azam Wicket Video: हार्दिकचा खतरनाक बॉल, थेट स्टम्पच्या ठिकऱ्या उडवल्या; बाबर आझम पुन्हा पुन्हा मागे वळून बघत बसला! VIDEO

वनडेत पाकिस्तानविरुद्ध खेळताना हा भारतीय संघाचा सर्वात मोठा विजय आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणने ट्विट करत लिहिले की, ' खूप शांतता आहे.. टिव्हीसोबत मोबाईल पण फोडले वाटतं..' तर माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने ट्विट करत लिहिले की, ' पाकिस्तानला फॉलोऑन द्या..' फॉलोऑन कसोटी क्रिकेटमध्ये लावला जातो, वनडे क्रिकेटमध्ये नाही. मात्र पाकिस्तानचा संघ विजयापासून २२८ धावा दूर राहिला. त्यामुळे आकाश चोप्राने हे खिल्ली उडवणारे ट्विट केले आहे.

यापूर्वी देखील जेव्हा दोन्ही संघ आमने सामने आले होते. त्यावेळी मजेशीर ट्विट करत पाकिस्तानची फिरकी घेतली होती. त्याने लिहिले होते की, ' शेजारच्यांचे टिव्ही वाचले..' (Latest sports updates)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारताचा संघ नाणेफेक गमावून फलंदाजीला आला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २ गडी बाद ३५६ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक १२२ तर केएल राहुलने १११ धावांची खेळी केली.

सलामीला आलेल्या रोहितने ५६ तर शुबमन गिलने ५८ धावांची खेळी केली. भारतीय संघाने दिलेल्या ३५७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव १२८ धावांवर संपुष्टात आला. या विजयासह भारतीय आशिया चषकाच्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान गाठले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com