पुण्याच्या 64 वर्षीय तरुणाची कमाल! सलग चार वर्ष जिंकला 'आर्यन मॅन'चा किताब
पुण्याच्या 64 वर्षीय तरुणाची कमाल! सलग चार वर्ष जिंकला 'आर्यन मॅन'चा किताब मंगेश कचरे

पुण्याच्या 64 वर्षीय तरुणाची कमाल! सलग चार वर्ष जिंकला 'आर्यन मॅन'चा किताब

कुठलेही ध्येय साध्य करायला वय आड येत नाही हे पुण्याच्या 64 वर्षीय दशरथ जाधव (Dashrath Jadhav) यांनी साध्य करून दाखवला आहे.

बारामती: कुठलेही ध्येय साध्य करायला वय आड येत नाही हे पुण्याच्या 64 वर्षीय दशरथ जाधव (Dashrath Jadhav) यांनी साध्य करून दाखवला आहे. वयाच्या 64 व्या वर्षी सलग चार वेळा खडतर असा आयर्न (Iron Man) मॅन किताब मिळवून दाखवला आहे आणि हा किताब मिळवणारे सर्वात वृद्ध भारतीय हा बहुमान देखील त्यांना मिळाला आहे.

नुकत्याच जर्मनीतील हाँगबर्ग येथे 29 ऑगस्ट झालेल्या आर्यन मॅन स्पर्धेत पुण्याच्या दशरथ जाधव यांनी बाजी मारली असून सर्वात वृद्ध भारतीय आर्यन मॅन बनण्याचा मान मिळवला आहे. जाधव यांनी वयाच्या 64 वर्षी आर्यन मॅन स्पर्धा जिकली आहे. 16 तासाची ही स्पर्धा त्यांनी 14 तास 12 मिनिटांत पूर्ण केली आहे .तरुणांन पुढे एक आदर्श ठेवला आहे गत वर्षी ही त्यांनी वयाच्या 63 व्या वर्षी आर्यन मॅन स्पर्धा पूर्ण करून आर्यन मॅन किताब मिळवला होता

पुण्याच्या 64 वर्षीय तरुणाची कमाल! सलग चार वर्ष जिंकला 'आर्यन मॅन'चा किताब
IND vs ENG: पाचवा कसोटीत विराट सेना 85 वर्षांचा इतिहास बदलणार

फुल आयर्नमॅन ही वर्ल्ड ट्रायथलॉन कॉरपोरेशन (डब्ल्यूटीसी) द्वारे आयोजित एक लांब-अंतर ट्रायथलॉन रेस आहे, यात 4 किमी पोहणे 180.2 किमी सायकल चालवणे आणि 42.20 किमी धावणे समाविष्ट आहे. त्या क्रमाने आणि ब्रेकशिवाय. हे संपूर्ण जगात एक सर्वात कठीण एक दिवसीय सहनशीलता कार्यक्रम आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com