ENG vs IND: बुमराह ने नोंदवला नवा विक्रम झहीर खानलाही टाकले मागे

इंग्लंडविरुद्धच्या (ENG vs IND) पहिल्या कसोटी सामन्यात हे सिद्ध केले आहे. बुमराहने यजमानांविरुद्धच्या या सामन्यात एकूण 9 बळी घेतले.
ENG vs IND: बुमराह ने नोंदवला नवा विक्रम झहीर खानलाही टाकले मागे
ENG vs IND: बुमराह ने नोंदवला नवा विक्रम झहीर खानलाही टाकले मागे Twitter/ @BCCI

जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) गणना जगातील सर्वात घातक गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याने इंग्लंडविरुद्धच्या (ENG vs IND) पहिल्या कसोटी सामन्यात हे सिद्ध केले आहे. बुमराहने यजमानांविरुद्धच्या या सामन्यात एकूण 9 बळी घेतले. पहिल्या डावात त्याने चार इंग्लिश फलंदाजांना बाद केले, तर दुसऱ्या डावात अर्ध्या संघाला म्हणजेच पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आपल्या गोलंदाजीच्या बळावर त्याने भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानचा (Zahir Khan) विक्रम मोडला आहे. दुसरीकडे, इंग्लंडने पहिल्या डावात 183 धावा आणि दुसऱ्या डावात 303 धावा केल्या आहे.

ENG vs IND: बुमराह ने नोंदवला नवा विक्रम झहीर खानलाही टाकले मागे
2008 नंतर प्रथमच ऑलिम्पिकमध्ये 'जन गण मन'!

बुमराहने झहीर खानचा विक्रम मोडला

जसप्रीत बुमराह आता इंग्लंडमध्ये भारतासाठी कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत 110 धावा देऊन 9 विकेट्स घेतल्या. त्याच्या आधी झहीर खान इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर होता. झहीर खानने 134 धावा देऊन 9 बळी घेतले होते, पण बुमराहच्या या कामगिरीनंतर तो आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. इंग्लंडच्या भूमीवर कसोटीत भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी ही माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्माची ने केलेली आहे. ज्याने कसोटी सामन्यात 188 धावा देऊन 10 विकेट्स घेतल्या होत्या.

भारतीय गोलंदाज अप्रतिम

भारतीय वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एकूण 20 विकेट्स घेतल्या. या सामन्यात फिरकीपटूला कोणतेही यश मिळालेले नाही. पहिल्या डावात बुमराहने चार, शमीने तीन, शार्दुलने दोन आणि सिराजने एक विकेट घेतली, तर दुसऱ्या डावात बुमराहने पाच, सिराज आणि शार्दुलने प्रत्येकी दोन तर शमीने एक बळी घेतला. संघातील एकमेव फिरकीपटू जडेजाला कोणतेही यश मिळाले नाही. जोहान्सबर्ग येथे 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या वतीने सर्व वेगवान गोलंदाजांनी एका कसोटी सामन्यात 20 विकेट्स घेतल्या होत्या, तर आता 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध, भारतीय वेगवान गोलंदाजांनी हा चमत्कार केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com