Cricket News: ज्या गोलंदाजावर टीम इंडियाची भिस्त होती, तोच ६ महिन्यासाठी संघाबाहेर; वर्ल्डकप मोहिमेला मोठा धक्का!

भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
Jasprit Bumrah Fitness
Jasprit Bumrah FitnessSaam TV

Japsrit Bumrah Injury Update: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे.

भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. (Latest sports updates)

Jasprit Bumrah Fitness
IND VS AUS: अंतिम कसोटी सामन्यासाठी टीम इंडियात मोठा बदल,'या' ३ खेळाडूंना रोहित ठेवणार संघाबाहेर

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. त्याच्या पाठीच्या दुखण्यामुळे तो भारतीय संघात खेळताना दिसून येत नाहीये.

या दुखापतीमुळे त्याला आशिया चषक स्पर्धा २०२२ आणि आयसीसी टी- २० विश्वचषक २०२२ स्पर्धेतून बाहेर राहावे लागले होते.

आता ही प्रतीक्षा आणखी लांबली आहे. कारण तो ६ महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे.

Jasprit Bumrah Fitness
IND VS AUS 4th Test: फलंदाज म्हणून जे गावसकर - अझहरुद्दीनलाही नाही जमलं; ते करत हिटमॅन रचणार इतिहास

जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी न्यूझीलंडमध्ये गेला होता. त्याची ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तो ६ महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे. त्यामुळे आता त्याच्या वनडे वर्ल्डकप खेळण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

जसप्रीत बुमराहने आतापर्यंत खेळलेल्या ३० कसोटी सामन्यांमध्ये १२८, ७२ वनडे सामन्यांमध्ये १२१ आणि ६० टी-२० सामन्यांमध्ये ७० गडी बाद केले आहेत.

तर आयपीएल स्पर्धेत त्याने मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करताना १२० सामन्यांमध्ये १४५ गडी बाद केले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com