Jasprit Bumrah Injury: बुमराहच्या दुखापतीबाबत सर्वात मोठी अपडेट, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत खेळू शकणार!

Jasprit Bumrah Injury: ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ४ कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.
Jasprit Bumrah Injury update
Jasprit Bumrah Injury updateSAAM TV

Jasprit Bumrah Injury: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहच्या चाहत्यांसाठी आणि टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला बुमराह (Jasprit Bumrah) आता लवकरच संघात पुनरागमन करू शकतो. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत भारतीय संघात खेळू शकतो.

ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये बॉर्डर गावस्कर करंडकचे (Border Gavaskar Trophy 2023) ४ कसोटी सामने आणि ३ एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. तो संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय.

Jasprit Bumrah Injury update
U-19 T20 World Cup - Team India च्या पोरी इतिहास घडवणार? फायनलमध्ये इंग्लडला धूळ चारण्यास 'शेफाली सेना' सज्ज..

दुखापतीशी देतोय झुंज

जसप्रीत बुमराह गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीशी झुंज देत आहे. दुखापतीमुळेच तो न्यूझीलंड मालिकेतही संघाचा भाग नव्हता. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. मात्र तो आता पुन्हा एकदा संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.

इनसाइडस्पोर्टच्या एका बातमीनुसार तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसू शकतो. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की "बुमराहला तंदुरुस्त होण्यासाठी एक महिना लागेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी तो तंदुरुस्त होईल अशी आम्हाला आशा आहे. पण ते त्याच्या प्रगतीवर अवलंबून असेल. सध्या तरी तो तंदुरुस्त नाही".

Jasprit Bumrah Injury update
IND vs NZ 2nd T20: मालिकेत बरोबरी साधण्यासाठी हार्दिकचा नवा प्लॅन, संघात या खेळाडूची एंट्री!

बुमराहची टीम इंडियासाठी कामगिरी

जुलै २०२२ मध्ये इंग्लंड दौऱ्यानंतर जसप्रीत बुमराहच्या कंबरेला 'स्ट्रेस फ्रॅक्चर' झाले होते. या दुखापतीमुळे तो आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतही खेळू शकला नाही. मात्र तो लवकरच पुनरागमनासाठी सज्ज आहे. बुमराहने टीम इंडियासाठी आतापर्यंत ३० कसोटी, ७२ एकदिवसीय आणि ६० टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत १२८ एकदिवसीय सामन्यात १२१ आणि टी-२० मध्ये ७० विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह सध्या भारतातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक मानला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com