IND VS AUS 1st Test : शतक झळकावताच रोहितला मिळाली वाईट बातमी!उर्वरित सामन्यांमध्ये चिंता वाढण्याची शक्यता

सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी पहिल्या २ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती.
IND VS AUS 1st Test
IND VS AUS 1st Test Saam Tv

IND VS AUS 1st Test : सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी पहिल्या २ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती.

या संघात जसप्रीत बुमराहला वगळण्यात आले होते. असे म्हटले जात होते की, दुखापतग्रस्त असेलला बुमराह फिट होऊन उर्वरित २ कसोटी सामन्यांमध्ये पुनरागमन करू शकतो. मात्र आता त्याच्या पुनरागमनाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या शेवटच्या २ कसोटी सामन्यांमध्ये देखील जसप्रीत बुमराह खेळताना दिसून येणार नाहीये. त्याला पहिल्या २ कसोटी सामन्यांसाठी संधी दिली गेली नाहीये. तर उर्वरित २ कसोटी सामन्यांमध्ये देखील त्याला संधी मिळणार नाहीये. तो बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतून बाहेर झाला आहे.

काय आहे कारण?

मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय जसप्रीत बुमराहच्या फिटनेस बाबत कुठलीही रिस्क घेणार नाहीये. तो फिट झाला तरीदेखील त्याला संधी दिली जाणार नाही. कारण जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाचा प्रमुख अस्त्र आहे.

त्याचा वापर आयसीसी वनडे विश्वचषकात केला जाणार आहे. त्यामुळे बीसीसीआय खबरदारी बाळगत आहे. मात्र अशी शक्यता वर्तवली जात आहे की, कसोटी मालिकेनंतर होणाऱ्या वनडे मालिकेत तो पुनरागमन करू शकतो.

जसप्रीत बुमराह सध्या एनसीएमध्ये सराव करतोय. फिटनेस मिळवल्यानंतर त्याने आता गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. कर्णधार रोहित शर्माला जसप्रीत बुमराह कसोटी संघात हवा होता. मात्र त्याच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी देखील चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे त्याची कमतरता जाणवत नाहीये.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com