
WPL 2023 Jemimah Rodrigues catch: गुरुवारी विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात विजय मिळवत मुंबई इंडियन्स संघाने विजयाची हॅट्ट्रिक केली आहे.
हा सामना जरी मुंबईने जिंकला असला तरी देखील दिल्ली कॅपिटल्स संघाची खेळाडू जेमिमा रॉड्रिग्जने आपल्या फिल्डिंगने सर्वांची मनं जिंकली आहेत.( Latest sports updates)
जेमिमा रॉड्रिग्ज ही सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. अनेकदा तिने भन्नाट झेल टिपले आहेत. मात्र मुंबई इंडियन्सविरुध्द खेळताना तिने आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल टिपला आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्स संघाला केवळ १०५ धावा करता आल्या होत्या. फलंदाजीत फ्लॉप झाल्यानंतर दिल्लीचे गोलंदाजही ;फ्लॉप ठरल्याचे पाहायला मिळाले. १२ व्या षटकातील २ चेंडू झाले होते.
मुंबईला विजय मिळवण्यासाठी केवळ २९ धावांची गरज होती. त्यावेळी हेली मॅथ्यूजने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा अंदाज चुकला. चेंडू हवेत जाताच, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करत असलेली जेमिमा रॉड्रिग्ज धावत आली आणि समोर डाईव्ह मारत भन्नाट झेल टिपला.
समालोचन करत असलेल्या आकाश चोपडाने हा या स्पर्धेतील सर्वोत्तम झेल असल्याचे म्हटले आहे. जर दिल्ली कॅपिटल्सने देखील हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.