CWG 2022 : वेदनेने विव्हळला , जमिनीवर पडला पण हरला नाही....जेरेमीला गोल्ड मेडल

राष्ट्रकुल स्पर्धेत तिसरा दिवस देखील भारतासाठी खूप महत्वपूर्ण आहे. १९ वर्षीय जेरेमी लालरिनुंगा या वेटलिफ्टरने पुरुषांच्या ६७ किलो वजनाच्या गटात सुवर्ण पदक जिंकले आहे.
jeremy lalrinnunga
jeremy lalrinnungaTwitter

नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेत तिसरा दिवस देखील भारतासाठी खूप महत्वपूर्ण ठरला आहे. १९ वर्षीय जेरेमी लालरिनुंगा (jeremy lalrinnunga) या वेटलिफ्टरने पुरुषांच्या ६७ किलो वजनाच्या गटात सुवर्ण पदक जिंकले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने दुसरं सुवर्ण पदक जिंकले आहे. जेरेमीच्या यशानंतर त्याचं कौतुक होत आहे. (Commonwealth Games 2022 jeremy lalrinnunga )

jeremy lalrinnunga
केएल राहुल झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर का होता, त्याने स्वत: केला खुलासा

जेरेमीने चार वर्षात तिसऱ्यांदा भारतीय तिरंग्याची शान उंचावली आहे. जेरेमीने २०१८ साली युवा ऑलम्पिक सुवर्ण पदक मिळवलं होतं. गेल्या वर्षी देखील राष्ट्रकुल स्पर्धेत चांगलं प्रदर्शन केलं होतं. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यानंतर चाहत्यांकडून पॅरिस ऑलम्पिक २०२४ मध्ये देखील सुवर्ण पदक त्यानं जिंकावं, अशी आशा व्यक्त करत आहेत.

jeremy lalrinnunga
केएल राहुल झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर का होता, त्याने स्वत: केला खुलासा

भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकलं पाचवं पदक

भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत पाच पदक जिंकले आहेत. सर्व पदक हे वेटलिफ्टिंगमध्ये (weightlifting) जिंकले आहेत. भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण पदक, दोन रौप्य पदक, कांस्य पदक जिंकले आहेत. जेरेमी लालरिनुंगाच्या आधी सांगलीच्या संकेत महादेव सरगरने देखील ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं. त्यानंतर गुरुराजा पुजारीने ६१ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकलं.

दरम्यान, मीराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकलं . बिंदियारानी देवीने भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत चौथं पदक जिंकलं. तिनं ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात भारतापेक्षा अधिक पदक हे ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. पदक जिंकल्यानंतर भारतीयांकडून पदक जिंकणाऱ्या पाचही जणांचं कौतुक होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com