कबड्डीच्या लाईव्ह सामन्यादरम्यान खेळाडूचा मैदानातच मृत्यू; नेमकं काय घडलं?

या घटनेनं क्रिडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली
Kabaddi Player Died In Live Match
Kabaddi Player Died In Live MatchSaam TV

चेन्नई : कबड्डी (Kabaddi) सामन्यादरम्यान एका खेळाडूचा दुर्दैवी अंत झाला आहे. कबड्डी खेळताना प्रतिस्पर्धी संघाच्या गोटात रेड मारायला गेलेल्या खेळाडूला (Sport) प्रतिस्पर्धी संघाने पकडलं. त्यांच्या तावडीतून बचाव करत असताना रेडर अचानक बेशुद्ध पडला. दरम्यान, त्याला उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनं क्रिडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. (Kabaddi Player Died In Live Match)

Kabaddi Player Died In Live Match
धक्कादायक! प्रियकराने दिला धोका, प्रेयसीने त्याच्या वडिलांशीच केलं लग्न

विमलराज कुड्डलोर (वय 22 वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या खेळाडूचं नाव आहे. चैन्नईच्या परूती शहरात ही घटना घडली आहे. लाईव्ह सामन्यादरम्यान, ही घटना घडल्याने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बघून नेटकऱ्यांनीही दु:ख व्यक्त केलं असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, परूती शहरात २४ जुलै रोजी जिल्हा पातळीवर कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी Murattu Kaalai या संघाचा दुसऱ्या संघासोबत सामना रंगला होता. सामना अतिशय रंगात आला असताना, Murattu Kaalai संघाकडून खेळणारा विमलराज हा रेड करायला गेला.

Kabaddi Player Died In Live Match
IND vs WI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांत टीम इंडियात होणार बदल; या खेळाडूंना मिळणार संधी?

तेव्हा त्याला प्रतिस्पर्षी खेळाडूंनी घट्ट पकडलं. त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करत असताना, अचानक विमलराज हा बेशुद्ध झाला. तेव्हा इतर खेळाडूंनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच विमलराजचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, विमलराज याला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. असा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. लाईव्ह सामन्यात एका खेळाडूचा अशाप्रकारे अंत झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून कुटुंबीयांना देखील धक्का बसला आहे. या घटनेनं कबड्डी प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com